ETV Bharat / sports

IPL २०२० : रसेलच्या जोरदार फटक्याने कॅमेरा चक्काचूर; पाहा व्हिडिओ - कोलकाता नाइट रायडर्स न्यूज

कोलकाता नाइट रायडर्सचा स्फोटक खेळाडू आंद्रे रसेलने नेट सरावादरम्यान, जोरदार चेंडू टोलावत कॅमेऱ्याचे काच फोडले.

Dre Russ-storm loading! KKR batsman's shot in nets shatters camera glass during net session - Watch
IPL २०२० : रसेलच्या जोरदार फटक्याने कॅमेरा चक्काचूर; पाहा व्हिडीओ
author img

By

Published : Sep 22, 2020, 4:51 PM IST

आबुधाबी - मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याने कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरूवात करणार आहे. उभय संघातील हा सामना २३ तारखेला होणार आहे. त्याआधी कोलकात्याचे खेळाडू सध्या कसून सराव करत आहेत. सरावादरम्यान, वेस्ट इंडिजचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने चेंडू टोलावत कॅमेऱ्याची काच फोडली. याचा व्हिडिओ कोलकाताने आपल्या अधिकृत्त ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

कोलकाता नाइट रायडर्सने शेअर केलेल्या व्हिडिओत, रसेल नेटमध्ये सरावादरम्यान, तुफान वेगाने चेंडू टोलावताना पाहायला मिळत आहे. तो मैदानाच्या चौफेर बाजूने चेंडू टोलावत आहे. याचवेळी नेट्समध्ये लावलेल्या कॅमेऱ्यालाही रसेलच्या फटकेबाजीचा बळी व्हावे लागले. रसेलचा एक जोरदार फटका थेट कॅमेऱ्याच्या काचेवर जाऊन आदळला आणि त्या कॅमेऱ्याचा चक्काचूर झाला.

दरम्यान, गतविजेत्या मुंबई संघाला सलामीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईने त्याचा पराभव केला. आता कोलकाताविरुद्ध मुंबईचा संघ दोन हात करणार आहे. मुंबईसमोर कोलकाताचे इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, सुनिल नरेन, दिनेश कार्तिक यासारख्या दिग्गज खेळाडूंचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - IPL २०२० : एका धडकेमुळे 'सनरायझर्स'च्या हातून सामना निसटला; पाहा व्हिडिओ

हेही वाचा - IPL २०२० : सनरायझर्स हैदराबादच्या अडचणीत वाढ, संपूर्ण स्पर्धेला मिचेल मार्श मूकण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.