नवी दिल्ली - बांगलादेश विरुध्दच्या कसोटी मालिकेत २-० ने निर्भेळ यश संपादन केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एक खुलासा केला आहे. त्याने भारताचा एक असा खेळाडू आहे. ज्याला धावण्यात मागे टाकणं असंभव असल्याचे सांगितलं. विराटच्या मते अष्टपैलू रवींद्र जडेजाला धावण्यात हरवणं असंभव आहे.
विराटने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत विराटसोबत रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत धावताना दिसत आहेत. विराटने या फोटोला मजेशीर कॅप्शनही दिले आहे.
-
Love group conditioning sessions. And when Jaddu is in the group, it’s almost impossible to outrun him 😃👌. @RishabhPant17 @imjadeja pic.twitter.com/QMK4nysoFh
— Virat Kohli (@imVkohli) November 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Love group conditioning sessions. And when Jaddu is in the group, it’s almost impossible to outrun him 😃👌. @RishabhPant17 @imjadeja pic.twitter.com/QMK4nysoFh
— Virat Kohli (@imVkohli) November 25, 2019Love group conditioning sessions. And when Jaddu is in the group, it’s almost impossible to outrun him 😃👌. @RishabhPant17 @imjadeja pic.twitter.com/QMK4nysoFh
— Virat Kohli (@imVkohli) November 25, 2019
त्या कॅप्शनमध्ये विराट म्हणतो, 'आम्हाला ग्रुप सराव करायला आवडतं. पण या सरावात जडेजाला मागे टाकणं सोपं नाही.'
दरम्यान, ३१ वर्षीय विराट आपल्या फिटनेसमुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर जिममध्ये घाम गाळतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात तो सिक्स पॅक दाखवताना दिसून आला होता.
-
No days off. #one8innerwear pic.twitter.com/ZlSdwSikqb
— Virat Kohli (@imVkohli) November 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">No days off. #one8innerwear pic.twitter.com/ZlSdwSikqb
— Virat Kohli (@imVkohli) November 18, 2019No days off. #one8innerwear pic.twitter.com/ZlSdwSikqb
— Virat Kohli (@imVkohli) November 18, 2019
हेही वाचा - कसोटी अजिंक्यपदाचा थरार...३६ तासात ३ संघानी मिळवला डावाने विजय, न्यूझीलंडने पाडला इंग्लंडचा फडशा
हेही वाचा - ऐतिहासिक विजयानंतर अनुष्काने दिलं विराटला खास सरप्राईज, व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा - मराठा अरेबियन्सने डेक्कनला धूळ चारत जिंकली टी-१० स्पर्धा