कराची - वसीम अक्रमने मला मॅच फिक्सिंगसाठी विचारले असते तर मी त्याचा जीव घेतला असता, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले आहे.
क्रिकेट पाकिस्तानने अख्तरच्या हवाल्याने सांगितले, ''मी १९९० चा सामना पाहत होतो आणि वसीम अक्रम त्याच्या स्विंग गोलंदाजीमुळे पाकिस्तानला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता. हे पाहून मी आश्चर्यचकित झालो. मी स्पष्टपणे सांगतो की जर अक्रमने मला मॅच फिक्सिंगबद्दल विचारले असते तर मी त्याला मारहाणही केली असती अथवा जीवही घेतला असता. परंतु त्याने मला असे कधीच सांगितले नाही."
अख्तरने अक्रमचे आभार मानले. "मी त्याच्याबरोबर सात-आठ वर्षे खेळलो आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या अव्वल फळीतील फलंदाज बाद करून त्याने मला नेहमी साथ दिली'', असेही अख्तरने म्हटले आहे.