मुंबई - आज संपूर्ण जगामध्ये फादर्स डे साजरा केला जात आहे. या दिवसाच्या निमित्ताने, भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही आपल्या बाबांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अजिंक्यने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन, लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. यात तो त्याच्या आई-बाबांसह पाहायला मिळत आहे. त्याने हा फोटो शेअर करत, बाबांनी नेहमी आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले, असे म्हटले आहे.
-
My father always taught me to believe in myself and inspired me to go further and beyond. ❤️
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) June 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Happy Father’s Day Baba!#HappyFathersDay2020 pic.twitter.com/nBgIEJjdvm
">My father always taught me to believe in myself and inspired me to go further and beyond. ❤️
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) June 21, 2020
Happy Father’s Day Baba!#HappyFathersDay2020 pic.twitter.com/nBgIEJjdvmMy father always taught me to believe in myself and inspired me to go further and beyond. ❤️
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) June 21, 2020
Happy Father’s Day Baba!#HappyFathersDay2020 pic.twitter.com/nBgIEJjdvm
अजिंक्यने याआधी एका मुलाखतीमध्ये आई-बाबांविषयी सांगितले होते. तो आईविषयी म्हणाला की, 'मी लहान असताना सरावासाठी आईसोबत जात असे. माझ्यामुळे आईला जवळपास ८ किलोमीटरचे अंतर पायी कापावे लागत होते. ती एका हातात लहान भावाचे हात तर दुसऱ्या हातात माझ्या क्रिकेटचे कीट घेऊन हे अंतर कापत असे. मला आर्थिक अडचणीमुळे आठवड्यातून एकदाच फक्त रिक्षाने सरावाला जाता येत होते.'
यानंतर त्याने वडिलांचा एक किस्साही बोलून दाखवला. डोंबिवली ते मुंबई क्रिकेटसाठी सरावाला जात असताना बाबा फक्त पहिला दिवस आपल्यासोबत आले होते. यानंतर मला ट्रेनमध्ये एका डब्यात बसवून, मी योग्य रितीने जातोय की नाही, हे पाहण्यासाठी ते माझ्या पाठीमागून यायचे, असे त्याने सांगितले.
एकवेळ अशी होती, की आर्थिक परिस्थिती बिकट बनल्याने अजिंक्यने क्रिकेटला रामराम ठोकायचा विचार केला होता. मात्र आईने हेच तुझे क्षेत्र आहे. यातूनच तुला नाव मिळेल असे सांगत अजिंक्यला क्रिकेट सोडण्यापासून परावृत्त केले होते. प्रवीण आमरे यांची भेट झाल्यापासून मात्र अजिंक्यने मागे वळून पाहिलेले नाही.
अजिंक्य रहाणे हा मुंबईकर म्हणून ओळखला जातो. मात्र, तो नगर जिल्ह्यातील आहे. त्याचे मूळ गाव संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी हे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव मधुकर तर आईचे नाव सुजाता असे आहे. अजिंक्यचे क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यामागे त्याच्या आई-बाबांचा मोठा हात आहे.
हेही वाचा - तब्बल पाच महिन्यानंतर शोएब आणि सानिया भेटणार!
हेही वाचा - लाबुशेनने वाढवला काऊंटी करार, चॅम्पियनशिपसाठी ठोकल्या होत्या 1114 धावा