नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे लवकरच 'बाप' बनणार आहे. त्याने सोशल मीडिया इंन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अजिंक्य रहाणे आपली गरोदर पत्नी राधिका हिच्यासोबत दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अजिंक्य रहाणे आणि राधिका हे 26 सप्टेंबर 2014 ला विवाहबंधनात अडकले होते. नुकत्याच झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत अंजिक्य रहाणेला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर आता आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यामध्येही रहाणेची फक्त कसोटी संघात वर्णी लागली आहे.
विश्वकरंडक स्पर्धेच्या दरम्यान, रहाणे आपल्या कुटुंबासह विम्बल्डनच्या मैदानात दिसून आला. तेव्हा त्या फोटोवर तुला क्रिकेटची आठवण येत नाही का अशा कमेंट करत चाहत्यांनी रहाणेला सोशल मीडियावर, ट्रोल केले होते. मागील काही महिन्यात रहाणेला आपला फॉर्म टिकवता आला नाही. यामुळे त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे.