एंटिगा - टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज दरम्यान होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. या दिवस अखेर भारताने ६ विकेट गमावून २०३ धावा केल्या. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली होती. तेव्हा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने संघाचा डाव सावरला. अजिंक्यला त्याच्या खेळीत शतक साकारता आले नाही.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजिंक्य ८१ धावांवर बाद झाला. अजिंक्यचे शतक थोडक्यासाठी हुकले असले तरी त्याला वाईट वाटलेले नाही. रहाणे म्हणाला, 'मी स्वार्थी नाही. मी नेहमी संघासाठी खेळतो. जेव्हा मी मैदानावर असतो तेव्हा मी तिथे जास्त वेळ थांबण्याचा विचार करतो. शतक हुकल्याने मी निराश नाही. आता आमचा संघ सुस्थितीत आहे.'
या दोन्ही संघातील सामना एंटिगाच्या विवियन रिचर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. २५ धावांच्या आतच भारताने आघाडीचे फलंदाज गमावले. मयंक अग्रवाल ५ धावा तर, चेतेश्वर पुजारा केवळ २ धावा करत माघारी परतला. ७ धावांमध्ये दोन खेळाडू गमावल्यानंतर कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र, त्यानेही निराशा केली. कोहलीने ९ धावा केल्यानंतर शैनन गेब्रियलच्या चेंडूवर तो बाद झाला.
त्यानंतर आलेल्या अजिंक्यने आपल्या कारकीर्दीतले १८ वे शतक बनवले. मात्र, त्याला शतक पूर्ण करता आहे नाही. ८१ धावा करत तो शैनन गेब्रियलच्या चेंडूवर बोल्ड झाला. पावसामुळे दुसऱ्या सत्रातील डाव १५ मिनिटे अगोदरच संपवण्यात आला. पहिल्या दिवस अखेर ऋषभ पंत २० आणि रविंद्र जडेजा ३ धावांवर खेळत आहेत.