नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. आता ट्विटरपाठोपाठ वॉटसनचे इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक झाले आहे. आज मंगळवारी दुपारी वॉटसनचा प्रोफाइल बायो बदलण्यात आला होता.
-
https://t.co/AXxf8f7YUC Former Australian cricket star Shane Watsons Instagram account was hacked on Tuesday. A series of objectionable images were posted from Watson's account and even his profile bio was changed since Tuesday afternoon#Shanewatson #hacked #Instagram pic.twitter.com/tG4UDJAgYN
— UiTV Connect (@UiTV_Connect) October 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">https://t.co/AXxf8f7YUC Former Australian cricket star Shane Watsons Instagram account was hacked on Tuesday. A series of objectionable images were posted from Watson's account and even his profile bio was changed since Tuesday afternoon#Shanewatson #hacked #Instagram pic.twitter.com/tG4UDJAgYN
— UiTV Connect (@UiTV_Connect) October 15, 2019https://t.co/AXxf8f7YUC Former Australian cricket star Shane Watsons Instagram account was hacked on Tuesday. A series of objectionable images were posted from Watson's account and even his profile bio was changed since Tuesday afternoon#Shanewatson #hacked #Instagram pic.twitter.com/tG4UDJAgYN
— UiTV Connect (@UiTV_Connect) October 15, 2019
हेही वाचा - 'जहाज बुडाल्यावर उत्तम दुर्बिणीचा काय उपयोग?', नीशमचा आयसीसीला टोला
वॉटसनचे अकाऊंट हॅक झाल्यानंतर, हॅकरने अश्लील फोटो पोस्ट केले होते. या घटनेबद्दल वॉटसनने माफी मागितली आहे. 'आक्षेपार्ह फोटोंबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे. त्याअगोदर शुक्रवारी माझे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. आता हे अकाऊंट परत मिळवण्यासाठी बराच वेळ लागत आहे. इन्स्टाग्रामने या दिशेने वेगाने कार्य केले पाहिजे', असे वॉटसनने ट्विटमध्ये म्हटले आहे.
आधुनिक क्रिकेटमध्ये शेन वॉटसन हा उत्तम फलंदाज आणि तितकाच चांगला गोलंदाज मानला जातो. त्याने ऑस्ट्रेलियाकडून १९० एकदिवसीय, ५९ कसोटी, आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. वॉटसनच्या खात्यात एकदिवसीय सामन्यांमध्ये ५७५७, कसोटीत ३७४१ आणि टी-२० मध्ये १४६२ धावा जमा आहेत. गोलंदाजीचे सांगायचे झाले तर, एकदिवसीय सामन्यांमध्ये १६८, कसोटीत ७५, आणि टी-२० मध्ये ४५ बळी वॉटसनने घेतले आहेत.