राजकोट - कोरोनामुळे सर्व क्रिकेट सामने आणि स्पर्धा रद्द झाल्या असताना भारतीय गोलंदाज जयदेव उनाडकटने या दहशतीतही आपला साखरपुडा उरकला. जयदेवने आपली मैत्रीण रिन्नी हिच्याशी साखरपुडा केला. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन रिन्नीसोबतचे फोटो ट्विट केले आहेत. भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजाराही या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होता.
-
6 hours, 2 meals & 1 shared mud cake later.. 💍❤️ pic.twitter.com/SEvHFDQwru
— Jaydev Unadkat (@JUnadkat) March 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">6 hours, 2 meals & 1 shared mud cake later.. 💍❤️ pic.twitter.com/SEvHFDQwru
— Jaydev Unadkat (@JUnadkat) March 15, 20206 hours, 2 meals & 1 shared mud cake later.. 💍❤️ pic.twitter.com/SEvHFDQwru
— Jaydev Unadkat (@JUnadkat) March 15, 2020
जयदेव उनाडकटने नुकत्याच पार पडलेल्या रणजी करंडक स्पर्धेत सौराष्ट्र संघाला आपल्या नेतृत्वात विजेतेपद मिळवून दिले. यानंतर त्याने आपली मैत्रीण रिन्नीसोबत साखरपुडा उरकला. त्यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला चेतेश्वर पुजारानेही हजेरी लावली होती. पुजारानेही सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत जयदेवचे अभिनंदन केले आहे.
-
Welcome to the family Rinny. I am so glad that my brother @JUnadkat has found the love of his life. 🤗
— cheteshwar pujara (@cheteshwar1) March 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
P:S - You have to deal with a lot of bromance pic.twitter.com/X9aZxFfm0o
">Welcome to the family Rinny. I am so glad that my brother @JUnadkat has found the love of his life. 🤗
— cheteshwar pujara (@cheteshwar1) March 15, 2020
P:S - You have to deal with a lot of bromance pic.twitter.com/X9aZxFfm0oWelcome to the family Rinny. I am so glad that my brother @JUnadkat has found the love of his life. 🤗
— cheteshwar pujara (@cheteshwar1) March 15, 2020
P:S - You have to deal with a lot of bromance pic.twitter.com/X9aZxFfm0o
रणजी करंडक २०१९-२० चा हंगाम जयदेवसाठी खास ठरला. कारण त्याने या हंगामात सर्वाधिक ६७ गडी बाद केले. रणजी क्रिकेटच्या इतिहासात या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त विकेट आहेत. रणजीच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम बिहारचा गोलंदाज आशुतोष अमनचा आहे. त्याने २०१८-१९ या हंगामात ६८ गडी बाद केले होते. बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या जयदेवला रणजीतील शानदार कामगिरीनंतर भारतीय संघात निवड होण्याची आशा आहे.
हेही वाचा - VIDEO : शोएब म्हणतो.. भारताला युद्ध नकोय; भारताची भरभराटी व्हायला हवी
हेही वाचा - कोरोनाच्या धोक्यामुळे दक्षिण आफ्रिकेत 'इतके' महिने क्रिकेट बंद