ETV Bharat / sports

अफगाणिस्तानच्या सलामीवीराचा मृत्यू; भीषण अपघातानंतर मृत्यूशी झुंज अपयशी

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर नजीब ताराकाई याचे आज निधन झाले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने याची माहिती ट्विटरवरुन दिली.

afghanistan opening batsman najeeb tarakai dies at the age of 29
अफगाणिस्तानच्या सलामीवीराचा मृत्यू; भीषण अपघातानंतर मृत्यूशी झुंज अपयशी
author img

By

Published : Oct 6, 2020, 12:47 PM IST

मुंबई - अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर नजीब ताराकाई याचे आज निधन झाले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने याची माहिती ट्विटरवरून दिली. नजीबच्या निधनाने अफगाणिस्तानसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. नजीबचा शुक्रवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर तो कोमात गेला होता.

  • ACB and Afghanistan Cricket Loving Nation mourns the heart breaking & grievous loss of its aggressive opening batsman & a very fine human being Najeeb Tarakai (29) who lost his life to tragic traffic accident leaving us all shocked!

    May Allah Shower His Mercy on him pic.twitter.com/Ne1EWtymnO

    — Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शुक्रवारी (ता. २ ) अफगाणिस्तानच्या नांगरहार येथील बाजारामध्ये सामनाची खरेदी करून रस्ता पार करण्यासाठी निघालेल्या नजीबला एका वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली होती. अपघातानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. यात त्याची सर्जरी करण्यात आली होती. या दरम्यान, तो कोमामध्ये गेला होता. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले होते. आज त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

२९ वर्षीय नजीबने १ एकदिवसीय आणि १२ टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१७मध्ये त्याने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात ९० धावांची खेळी साकारली होती. त्याच्या याच खेळीच्या जोरावर अफगाणिस्ताने हा सामना १७ धावांनी जिंकला होता.

हेही वाचा - IPL २०२० : सनरायजर्स हैदराबादला मोठा धक्का; जखमी भुवनेश्वर कुमार आयपीएलमधून 'आऊट'

हेही वाचा - RCB vs DC : प्रशिक्षकाची आज्ञा अन् अश्विनने सोडली मंकडींगची संधी; पाँटिंगने दिली हसून दाद, पाहा व्हिडीओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.