नवी दिल्ली - अफगाणिस्तान क्रिकेट संघ वेस्ट इंडीजविरुध्दची मालिका खेळण्यासाठी भारतात दाखल झाला आहे. अफगाणिस्तान-वेस्ट इंडीज संघात तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि एक कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट बोर्डने लखनऊमध्ये तयार करण्यात आलेले इकाना हे मैदान अफगाणिस्तान संघाला घरचे मैदान बनवण्याची परवानगी दिलेली आहे.
अफगाणिस्तान-वेस्ट इंडीज संघामधील दौऱ्याला एकदिवसीय मालिकेतून सुरुवात होणार असून या मालिकेतील पहिला सामना ६ नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ ३१ ऑक्टोबरला भारतात पोहोचण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तान-वेस्ट इंडीज संघातील एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक -
- पहिला सामना ६ नोव्हेंबर - अटल बिहारी वाजपेयी एकना मैदान लखनऊ
- दुसरा सामना ९ नोव्हेंबर - अटल बिहारी वाजपेयी एकना मैदान लखनऊ
- तिसरा सामना ११ नोव्हेंबर - अटल बिहारी वाजपेयी एकना मैदान लखनऊ
अफगाणिस्तान-वेस्ट इंडीज संघातील टी-२० मालिकेचे वेळापत्रक -
- पहिला टी-२० सामना १४ नोव्हेंबर - अटल बिहारी वाजपेयी एकना मैदान लखनऊ
- दुसरा टी-२० सामना १६ नोव्हेंबर - अटल बिहारी वाजपेयी एकना मैदान लखनऊ
- तिसरा टी-२० सामना १७ नोव्हेंबर - अटल बिहारी वाजपेयी एकना मैदान लखनऊ
अफगाणिस्तान-वेस्ट इंडीज संघातील एकमेव कसोटी सामना २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या दरम्यान, एकना मैदानावर रंगणार आहे.