अबुधाबी - झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकत अफगाणिस्तानने दोन सामन्याची मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली. अफगाणिस्तानने दुसरा सामना ६ गडी राखून जिंकला. रहमत शाहने दुसऱ्या डावात ५८ धावांची खेळी केली. तर राशिद खानने सामन्यात ७ गडी बाद केले.
अफगाणिस्तानने आपला पहिला डाव हश्मतुल्लाहच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर ५४५ धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेचा डाव २८७ धावांत आटोपला. यानंतर झिम्बाब्वेने दुसऱ्या डावात ३६५ धावा करत अफगाणिस्तानसमोर विजयासाठी १०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
अफगाणिस्ताने पाचव्या दिवशी हे लक्ष्य ४ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. रहतमत शाहने ५८ धावांची खेळी केली. या सामन्यातील पहिल्या डावात द्विशतक ठोकणारा हश्मतुल्लाह सामनावीर ठरला. तर सीन विल्यम्सला मालिकावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. उभय संघात १७ मार्चपासून तीन सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा - Ind vs Eng २nd T२० : नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
हेही वाचा - VHT २०२१ Final : मुंबईचा विजय हजारे करंडकावर कब्जा, अंतिम सामन्यात यूपीचा उडवला धुव्वा