मेलबर्न - आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत थायलंड विरुद्ध पाकिस्तान या संघातील सामना पावसामुळे रद्द झाला. मंगळवारी सिडनीमध्ये झालेल्या या सामन्यात दोनही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळाले. थायलंडचा डाव संपल्यानंतर पावसाने हजेरी लावली. तेव्हा थायलंडच्या महिला खेळाडूंनी मैदानातच डान्स करण्यास सुरूवात केली. टी-२० विश्व करंडकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन थायलंडच्या खेळाडूंचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ पाहून अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान थायलंडच्या खेळाडूंचा 'फॅन' झाला आहे.
-
During the rain delay, Thailand kept the fans entertained on the big screen with an impromptu dance-off 🕺
— T20 World Cup (@T20WorldCup) March 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Thank you for being part of #TheBigDance!#T20WorldCup pic.twitter.com/0wx0Nbzxuy
">During the rain delay, Thailand kept the fans entertained on the big screen with an impromptu dance-off 🕺
— T20 World Cup (@T20WorldCup) March 3, 2020
Thank you for being part of #TheBigDance!#T20WorldCup pic.twitter.com/0wx0NbzxuyDuring the rain delay, Thailand kept the fans entertained on the big screen with an impromptu dance-off 🕺
— T20 World Cup (@T20WorldCup) March 3, 2020
Thank you for being part of #TheBigDance!#T20WorldCup pic.twitter.com/0wx0Nbzxuy
थायलंडचा महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी झाला आहे. त्यांना तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. अखेरच्या पाकिस्तानविरुद्ध सामन्यात थायलंडने दमदार फलंदाजी केली. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १५० धावा केल्या. ही त्यांची टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या ठरली. पाक विरुद्धच्या सामन्यात नथाकन चँटम आणि नताया बुचाथम या सलामीवीर जोडीने ९३ धावांची सलामी दिली.
थायलंडचा डाव संपल्यानंतर पावसाने हजेरी लावली. तेव्हा थायलंडच्या खेळाडूंनी डान्स केला. याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर राशिद खान यानेही प्रतिक्रिया दिली असून त्याने मी थायलंडच्या खेळाडूंचा फॅन झालो असे म्हटलं आहे.
हेही वाचा - विराट, आता तुझं वय झालंय अधिक सराव कर.., भारताच्या माजी कर्णधाराचा सल्ला
हेही वाचा - कोरोनाची दहशत : इंग्लंडचे खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हात मिळवणार नाहीत