अबुधाबी - रहमानुल्लाह गुरबाजची ८७ धावांची खेळी त्यानंतर राशिद खानची फिरकी गोलंदाजी याच्या जोरावर अफगाणिस्तानने पहिल्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा ४८ धावांनी पराभव केला. या विजयासह अफगाणिस्तानने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अफगाणिस्तानने २० षटकात ५ बाद १९८ धावांचा डोंगर उभारला. यात रहमानुल्लाह गुरबाजने ४५ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांसह ८७ धावांची खेळी केली. त्याने करीमसोबत ८० धावांची सलामी दिली. यानंतर असगर अफगानने ३८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारासह ५५ धावांची खेळी केली.
अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेले १९९ धावांचे लक्ष्य झिम्बाब्वे संघाला पेलावले नाही. त्यांचा संघ २० षटकात ७ बाद १५० धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणामी अफगाणिस्तानने हा सामना ४८ धावांनी जिंकला. राशिद खानने २८ धावांत ३ गडी बाद करत संघाच्या विजयात योगदान दिले. रहमानुल्लाह याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. उभय संघातील दुसरा टी-२० सामना १९ मार्चला खेळला जाणार आहे.
हेही वाचा - ICC T२० Rankings : कोहलीला 'विराट' कामगिरीचे बक्षिस, राहुलला फटका
हेही वाचा - महिला क्रिकेट: पराभवाची मालिका सुरूच, पाचव्याडेत अफ्रिकेचा भारतावर ५ गडी राखून विजय