चेन्नई - इंग्लंडचा स्टार क्रिकेटर डोमिनिक बेस पत्रकार परिषदेदरम्यान, बालबाल बचावला. घडले असे की, भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तेव्हा बेस माध्यमाशी बोलत होता. तेव्हा अचानक त्याच्या पाठीमागे असलेला जाहिरात बोर्ड त्यांच्या डोक्यावर पडला.
जाहिरात बोर्ड पडताना बेस यांच्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीने तो बोर्ड हाताने पकडला. पण हे सारं घडत असताना, बेस याने पत्रकार परिषदेत बोलणे सुरूच ठेवले. जेव्हा बोर्ड त्याच्या डोक्यावर आदळला तेव्हा तो, मी काय बोलत होते, असे विचारले आणि पत्रकार परिषदेत उत्तर दिली.
पत्रकार परिषद संपल्यानंतर तो जाहिरात बोर्ड व्यवस्थित ठेवण्यात आला. दरम्यान, फिरकीपटू डोम बेसने पहिल्या डावात २६ षटकात ७६ धावा देत ४ विकेट घेतल्या. यात त्याने विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा या महत्वाच्या खेळाडूंना बाद केलं.
तिसऱ्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत बेसने, माझ्यासाठी विराट कोहलीची विकेट माझ्या करियरमधील सर्वश्रेष्ठ विकेटमधील एक असल्याचे सांगितले.
सामना रंगतदार स्थितीत...
इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवसाअखेर १ बाद ३९ धावा केल्या आहेत. सलामीवीर रोहित शर्मा पहिल्या डावापाठापोठ दुसऱ्या डावात देखील अपयशी ठरला. जॅक लिचच्या गोलंदाजीवर तो १२ धावांवर त्रिफाळाचित झाला.
अखेरच्या दिवशी भारतीय संघाला ९० षटकांत ३८१ धावा करायच्या आहेत. तर इंग्लंड संघाला विजयासाठी ९ गडी बाद करावे लागतील. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शुबमन गिल १५ आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा १२ धावांवर नाबाद होते. दरम्यान, २००८ साली भारतीय संघाने चेन्नईमध्ये इंग्लंड विरोधातच चौथ्या डावात ३८७ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता. यात सचिन तेंडुलकरने शानदार शतक झळकावले होते. त्यामुळे या सामन्यात भारतीय फलंदाज कशी फलंदाजी करणार यांची उत्सुकता आहे.
हेही वाचा - PAK vs SA: दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश, कसोटी मालिकेत पाकिस्तान २-० ने विजयी
हेही वाचा - Ind vs Eng : भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांचे आव्हान; अश्विनचा विकेट्सचा षटकार