ETV Bharat / sports

अबुधाबीत रंगणार अजून एक क्रिकेट लीग - Abu dhabi t10 league dates

अबुधाबी टी-१० लीग पुढील वर्षी २८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात येईल.

Abu dhabi t10 league to be played from 28 january
अबुधाबीत रंगणार अजून एक क्रिकेट लीग
author img

By

Published : Oct 13, 2020, 3:19 PM IST

अबुधाबी - अबुधाबी टी-१० लीगचा चौथा हंगाम पुढील वर्षी २८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान शेख झायेद स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेत आठ संघ भाग घेतील. "२०१७मध्ये शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये या स्पर्धेची सुरुवात झाल्यापासून टी-१० लीग सर्वात वेगवान स्वीकारलेली आणि सुप्रसिद्ध क्रिकेट स्पर्धा बनली आहे", असे टी-१० स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे संस्थापक आणि अध्यक्ष शाजी एल. मुल्क यांनी सांगितले.

दरम्यान, टी-१० स्पोर्ट्स मॅनेजमेन्टने आयसीसीचे माजी सीईओ आरोन लोगट यांची नीती व विकास संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. लोगट आता टी-१० क्रिकेटच्या विकासासाठी सल्ला देतील. लोगोट २००८ ते २०१२पर्यंत आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. यंदाची आयपीएल स्पर्धाही अबुधाबीव्यतिरिक्त दुबई आणि शारजाह येथे खेळवली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.