नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात धूमाकूळ घातला असून या व्हायरसने क्रीडाविश्वातही शिरकाव केला आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने स्वत: ला कोरोनाची लागण झाल्याचे उघड केले. त्यानंतर जगभरातून त्याच्या चाहत्यांनी तो ठीक व्हावा, म्हणून प्रार्थना केली. पण शाहिदच्या विरोधकांनी अशा परिस्थितीतही त्याला ट्रोल केले. या ट्रोलिंगबाबत भारताच्या माजी क्रिकेटपटूने आपला राग व्यक्त केला.
माजी भारतीय कसोटी सलामीवीर आकाश चोप्राने ट्विटरवर एक स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये असे लिहिले होते, की शाहिद आफ्रिदीला त्याच्या दुष्कर्मांबद्दल शिक्षा झाली आहे. हा स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर आकाश चोप्राने आपले मत दिले. तो म्हणाला, ''हे गांभीर्य आहे का? मानवता इतिहास बनली आहे का? शाहिद आफ्रिदी तुला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.''
-
Are we serious?? Sensitivity...humanity...thing of the past?? Wish you a speedy recovery, Shahid. May the force be with you 🙌 pic.twitter.com/RlBBi5zBzs
— Aakash Chopra (@cricketaakash) June 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Are we serious?? Sensitivity...humanity...thing of the past?? Wish you a speedy recovery, Shahid. May the force be with you 🙌 pic.twitter.com/RlBBi5zBzs
— Aakash Chopra (@cricketaakash) June 14, 2020Are we serious?? Sensitivity...humanity...thing of the past?? Wish you a speedy recovery, Shahid. May the force be with you 🙌 pic.twitter.com/RlBBi5zBzs
— Aakash Chopra (@cricketaakash) June 14, 2020
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने लोकांच्या आशिवार्दासाठी नुकतेच आभार मानले होते. ''जे लोक माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि मला संदेश पाठवत आहेत त्यांचे आभार. आपणा सर्वांचे मनापासून आभार. कृपया या कठीण काळात सुरक्षित राहा आणि गरजू लोकांना मदत करा. आपणा सर्वांना खूप प्रेम'', असे आफ्रिदीने ट्विटद्वारे म्हटले.
40 वर्षीय आफ्रिदीने 2016 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने 20 वर्षाच्या करिअरमध्ये 27 कसोटी, 398 एकदिवसीय सामने आणि 99 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने अनुक्रमे 1716, 8064, 1416 धावा केल्या आहेत. आफ्रिदीने आयपीएलमध्ये 10 सामने खेळले असून त्यात त्याने 81 धावा केल्या आहेत.