नवी दिल्ली : इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने मंगळवारी डरहम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा ( Ben Stokes announced retirement ODI cricket ) केली. स्टोक्सने 104 एकदिवसीय सामने खेळले आणि या फॉरमॅटमधील त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट त्याच्या घरच्या मैदानावर होईल. आपल्या देशाला 2019 चा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्टोक्सने तब्बल तीन वर्षांनंतर या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
-
❤️🏴 pic.twitter.com/xTS5oNfN2j
— Ben Stokes (@benstokes38) July 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">❤️🏴 pic.twitter.com/xTS5oNfN2j
— Ben Stokes (@benstokes38) July 18, 2022❤️🏴 pic.twitter.com/xTS5oNfN2j
— Ben Stokes (@benstokes38) July 18, 2022
बेन स्टोक्सने निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेट जगताने त्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने इंस्टाग्रामवर स्टोक्सला वनडेतून निवृत्तीसाठी शुभेच्छा ( Virat Kohli Wishes to Ben Stokes ) दिल्या आहेत. त्याने लिहिले की, मी ज्या खेळाडूंविरुद्ध खेळलो त्यात तू सर्वोत्तम प्रतिस्पर्धी होतास. मला तुझ्याबद्दल खूप आदर आहे. 2010 मध्ये आयसीसी पुरुष अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यापासून ते 2019 मध्ये आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक चॅम्पियन बनण्यापर्यंत आयसीसीने ट्विट केले आहे. काय खास एकदिवसीय खेळाडू आणि काय करिअर! धन्यवाद बेन स्टोक्स.
-
From featuring in an ICC Men's U19 Cricket World Cup in 2010 to becoming an ICC Men's @cricketworldcup champion in 2019 🏆
— ICC (@ICC) July 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A special ODI player, and what a career!
Thank you, @benstokes38! pic.twitter.com/uIFjafwEAe
">From featuring in an ICC Men's U19 Cricket World Cup in 2010 to becoming an ICC Men's @cricketworldcup champion in 2019 🏆
— ICC (@ICC) July 18, 2022
A special ODI player, and what a career!
Thank you, @benstokes38! pic.twitter.com/uIFjafwEAeFrom featuring in an ICC Men's U19 Cricket World Cup in 2010 to becoming an ICC Men's @cricketworldcup champion in 2019 🏆
— ICC (@ICC) July 18, 2022
A special ODI player, and what a career!
Thank you, @benstokes38! pic.twitter.com/uIFjafwEAe
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आणि त्याचा साथीदार स्टुअर्ट ब्रॉडने ( Fast bowler Stuart Broad ) स्टोक्सच्या पोस्टवर लिहिले, हे चित्र. मंगळवारचा आनंद घे मित्रा. इंग्लंडचा फलंदाज सॅम बिलिंग्जनेही अष्टपैलू खेळाडूच्या पोस्टवर, नाईस प्लेअर अशी टिप्पणी केली. मंगळवारचा आनंद घे. इंग्लंड क्रिकेटने अष्टपैलू खेळाडूचे त्याच्या योगदानाबद्दल आभार मानले आणि लिहिले, 11 वर्षे आणि अगणित एकदिवसीय आठवणी, बेन स्टोक्सचे आभार.
-
11 years and countless ODI memories ❤️
— England Cricket (@englandcricket) July 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Thank you, @benstokes38 👏 pic.twitter.com/TroqvkZwsw
">11 years and countless ODI memories ❤️
— England Cricket (@englandcricket) July 18, 2022
Thank you, @benstokes38 👏 pic.twitter.com/TroqvkZwsw11 years and countless ODI memories ❤️
— England Cricket (@englandcricket) July 18, 2022
Thank you, @benstokes38 👏 pic.twitter.com/TroqvkZwsw
त्याचबरोबर स्टोक्सच्या या निर्णयामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन ( Former captain Nasir Hussain ) आश्चर्यचकित झाला आहे. विश्वचषक 2019 फायनलच्या ऐतिहासिक क्षणापासून, 31 वर्षीय बेन स्टोक्स दुखापती, मानसिक आरोग्य ब्रेक आणि वर्कलोड व्यवस्थापनाच्या संयोजनामुळे फक्त नऊ एकदिवसीय सामने खेळला आहे. इंग्लंडच्या स्टारने आपल्या वक्तव्यात अस्थिर वेळापत्रकाचा उल्लेख केला. यावर इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसैन यांनी स्काय स्पोर्ट्सला सांगितले की, हे प्रकरण वेळापत्रकाशी संबंधित आहे. जर आयसीसी फक्त आयसीसीच्या इव्हेंटमध्येच गुंतलेली असेल आणि वेगवेगळ्या बोर्डांनी शक्य तितक्या क्रिकेटची पोकळी भरून काढली तर शेवटी हे क्रिकेटपटू 'अब बहूत हुआ है' म्हणतील.
हेही वाचा - ISSF World Cup : मैराज खानने रचला इतिहास; स्कीटमध्ये भारताला मिळवून दिले पहिले सुवर्णपदक