मुंबई: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( Delhi Capitals vs Rajasthan Royals ) यांच्यात आज आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 34 वा सामना खेळला जात आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना सुरु होण्यापूर्वी त्यांच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या सामन्यादरम्यान दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग मैदानावर उपस्थित राहणार नाहीत. दिल्ली कपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या कुटुंबातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे ( Ponting family member covid-19 Positive ) आढळून आले आहे. त्यामुळे पाँटिंगला आयसोलेट व्हावे लागले आहे.
फ्रँचायझीच्या माहितीनुसार, पाँटिंगने स्वत: नंतर दोनदा कोरोना चाचणी केली असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, संघाचे हित लक्षात घेऊन व्यवस्थापन आणि वैद्यकीय पथकाने त्याला पाच दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण तो कुटुंबातील सदस्याच्या संपर्कात आला होता. त्यामुळे तो आज रात्री राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानावर उपस्थित राहणार नाही.
-
OFFICIAL STATEMENT:
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A family member of Delhi Capitals Head Coach Ricky Ponting has tested positive for COVID-19. The family has now been moved into an isolation facility and is being well taken care of. pic.twitter.com/FrQXjlSYRI
">OFFICIAL STATEMENT:
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 22, 2022
A family member of Delhi Capitals Head Coach Ricky Ponting has tested positive for COVID-19. The family has now been moved into an isolation facility and is being well taken care of. pic.twitter.com/FrQXjlSYRIOFFICIAL STATEMENT:
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 22, 2022
A family member of Delhi Capitals Head Coach Ricky Ponting has tested positive for COVID-19. The family has now been moved into an isolation facility and is being well taken care of. pic.twitter.com/FrQXjlSYRI
अशा परिस्थितीत, फ्रँचायझी विनंती केली आहे की, सध्याच्या परिस्थितीत पाँटिंग ( Delhi Capitals coach Ricky Ponting ) आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर केला जावा. बायो-बबलमध्ये आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व व्यक्तींच्या प्रकृतीवर बारीक नजर ठेवली जात आहे. तसेत टीमने सर्वांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे, दिल्ली कॅपिटल्सच्या संघात यापूर्वीच कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. फिजिओ पॅट्रिक फरहार्ट ( Physio Patrick Farhart ), ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श आणि न्यूझीलंडचा यष्टिरक्षक टिम सेफर्ट यांचाही यात समावेश होता. दिल्ली कॅपिटल्सच्या पथकातील पॉझिटिव्ह आढळलेले सदस्य पुढीलप्रमाणे आहेत...
- पॅट्रिक फरहार्ट (फिजियो)
- चेतन कुमार (मसाज थेरेपिस्ट)
- मिचेल मार्श (खेळाडू)
- अभिजीत साल्वी (डॉक्टर)
- आकाश माणे (सोशल मीडिया टीम)
- टिम सेफर्ट (खेळाडू)
हेही वाचा - Sachin Tendulkar's 49th Birthday : मुंबईतल्या सनी काजळेने साठवला हजारो बातम्यांमधील सचिन