ETV Bharat / sports

Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का; नीरज चोप्राने घेतली माघार - sports news

राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा जखमी झाला आहे. त्यामुळे त्याने नाव मागे घेतले आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) मंगळवारी ही माहिती दिली.

Neeraj Chopra
नीरज चोप्रा
author img

By

Published : Jul 26, 2022, 4:50 PM IST

नवी दिल्ली : भालाफेकपटू नीरज चोप्राने फिटनेसच्या समस्येमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली ( Neeraj Chopra out of Commonwealth Games ) आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) मंगळवारी ही माहिती दिली. चोप्राने रविवारी यूजीन येथील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले होते, परंतु स्पर्धेदरम्यान त्याच्या पायाच्या स्नायूंवर ताण ( Neeraj Chopra leg muscles strain )आला होता. आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता ( IOA General Secretary Rajiv Mehta ) यांनी सांगितले की, गत ऑलिम्पिक चॅम्पियन चोप्राला एक महिन्याच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

ते म्हणाले, "भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Indian javelin thrower Neeraj Chopra ) याने आज सकाळी अमेरिकेतून माझ्याशी फोनवर चर्चा केली. तसेच तंदुरुस्तीच्या चिंतेमुळे बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होण्यास असमर्थता व्यक्त केली." मेहता यांनी सांगितले की, चोप्रा यांनी युजीन येथील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतल्यानंतर सोमवारी एमआरआय केले आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने त्याला एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

हा 24 वर्षीय खेळाडू जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय ( Second Indian win medal World Championships ) खेळाडू ठरला. त्याच्या आधी अंजू बॉबी जॉर्जने 2003 च्या जागतिक स्पर्धेत लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. चोप्रा गुरुवारपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक होण्याची शक्यता होती. भारतीय संघाचे पक्षप्रमुख राजेश भंडारी यांनी पीटीआयला सांगितले की, आता आमची एक बैठक होणार आहे. ज्यामध्ये नवीन ध्वजवाहक निवडला जाईल.

हेही वाचा - Boxer Lovlina Borgohen : लोव्हलिना बोरगोहेनचा भारतीय बॉक्सिंग फेडरेशनवर मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.