ETV Bharat / sports

Colin de Grandhomme Retires : कॉलिन डी ग्रँडहोमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती - sports news

झिम्बाब्वेमध्ये जन्मलेल्या डी ग्रँडहोमने ( Colin de Grandhomme ) या निर्णयामागील कारण त्याची दुखापत आणि तिन्ही फॉरमॅटमधील वाढती स्पर्धा यासह अन्य कारणे असल्याचे सांगितले. न्यूझीलंड क्रिकेटने येथे जारी केलेल्या निवेदनात डी ग्रँडहोम म्हणाले की, मी यापुढे तरुण राहणार नाही हे मला मान्य आहे आणि विशेषत: दुखापतींमुळे सराव करणे कठीण होत आहे.

कॉलिन डी ग्रँडहोम
Colin de Grandhomme
author img

By

Published : Aug 31, 2022, 3:06 PM IST

वेलिंग्टन: न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोमने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर ( Colin de Grandhomme retires from international cricket ) केली. डी ग्रँडहोमने या आठवड्यात न्यूझीलंड क्रिकेटशी त्याच्या निर्णयावर चर्चा केली होती, ज्याने त्याला केंद्रीय करारातून मुक्त करण्याचे मान्य केले. झिम्बाब्वेमध्ये जन्मलेल्या डी ग्रँडहोमने या निर्णयामागील कारण त्याच्या दुखापती आणि तिन्ही फॉरमॅटमधील वाढती स्पर्धा यासह अन्य कारणे असल्याचे सांगितले. न्यूझीलंड क्रिकेटने येथे जारी केलेल्या निवेदनात डी ग्रँडहोम म्हणाले की, मी यापुढे तरुण राहणार नाही हे मला मान्य आहे आणि विशेषत: दुखापतींमुळे सराव करणे कठीण होत आहे.

“माझी मुलं मोठी होत आहेत आणि मी क्रिकेटनंतर माझ्या भविष्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. गेले काही आठवडे या सगळ्या गोष्टी माझ्या मनात घोळत होत्या. डी ग्रँडहोम म्हणाला, मी खूप भाग्यवान आहे की मला 2012 मध्ये पदार्पण केल्यानंतर न्यूझीलंडकडून खेळण्याची संधी मिळाली. मला माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा अभिमान आहे, पण मला वाटते की निवृत्तीची हीच योग्य वेळ ( Colin de Grandhomme statement ) आहे.

डी ग्रँडहोमने ( All-rounder Colin de Grandhomme ) न्यूझीलंडकडून 29 कसोटी सामने खेळले ज्यात त्याने 38.70 च्या सरासरीने 1432 धावा केल्या. त्यात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शतकांचाही समावेश आहे. याशिवाय त्याने 32.95च्या सरासरीने 49 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी 41 धावांत 6 बळी ही त्याने पाकिस्तानविरुद्ध केली होती. त्याने 45 एकदिवसीय सामन्यांमध्ये 742 धावा केल्या आणि 30 बळी घेतले. डी ग्रँडहोम 2019 मध्ये आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या न्यूझीलंड संघाचा भाग होता.

या अष्टपैलू खेळाडूने 41 टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने देखील खेळले ज्यात त्याने 505 धावा केल्या आणि 12 बळी घेतले.

हेही वाचा - Japan Open Super 750 Badminton : लक्ष्य सेन जपान ओपनच्या दुसऱ्या फेरीतून बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.