नवी दिल्ली : नागपुर कसोटीत एक डाव आणि 132 धावांनी मोठा विजय मिळवल्यानंतर भारताच्या नजरा शुक्रवारपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होत असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील दुसऱ्या कसोटीवर असणार आहेत. याशिवाय अव्वल फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असणार आहे, कारण पुजारा त्याच्या कारकीर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांवर संपुष्टात आला.
आजची ऑस्ट्रेलियाची फलंदाजी : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना डेव्हीड वाॅर्नर, मार्नस लाबुनशेन, स्टेव्हन स्मिथ ट्रॅव्हीस हेड यांच्या महत्तपूर्ण विकेट गमावल्या आहेत. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 31 षटकांत 108 धावा केल्या. प्रथम आलेल्या डेव्हीड वाॅर्नरने 44 चेंडूत 15 धावा केल्या, तर मार्नस लाबुनशेन याने 25 चेंडूत 18 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या स्टीव्हन स्मिथला आपले खाते उघडता आले नाही तो (0) भोपळ्यावरच पॅव्हेलिनमध्ये परतला. त्यानंतर ट्रॅव्हीस हेडला 12 धावांवर शमीने झेलबाद केले.
-
Innings Break!
— BCCI (@BCCI) February 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Australia are all out for 263 in the first innings.
4️⃣ wickets for @MdShami11 👌🏻
3️⃣ wickets apiece for @ashwinravi99 & @imjadeja 👍🏻
Scorecard ▶️ https://t.co/hQpFkyZGW8 #TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/RZvGJjsMvo
">Innings Break!
— BCCI (@BCCI) February 17, 2023
Australia are all out for 263 in the first innings.
4️⃣ wickets for @MdShami11 👌🏻
3️⃣ wickets apiece for @ashwinravi99 & @imjadeja 👍🏻
Scorecard ▶️ https://t.co/hQpFkyZGW8 #TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/RZvGJjsMvoInnings Break!
— BCCI (@BCCI) February 17, 2023
Australia are all out for 263 in the first innings.
4️⃣ wickets for @MdShami11 👌🏻
3️⃣ wickets apiece for @ashwinravi99 & @imjadeja 👍🏻
Scorecard ▶️ https://t.co/hQpFkyZGW8 #TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/RZvGJjsMvo
उपहारानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी : भारताच्या गोलंदाजांनी कांगारूंना जेरील आणले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने हेडला 12 धावांवर केएल राहुलद्वारा झेलबाद केले. त्यानंतर उमर ख्वाजा रविचंद्रन अश्विनने कर्णधार रोहित शर्माद्वारा झेलबाद केले. त्याने 81 धावांची शानदार पारी खेळली. त्यानंतर अॅलेक्स कॅरीला अश्विनने कोहलीद्वारा झेलबाद करीत भोपळ्यावर घरचा रस्ता दाखवला. रविंद्र जडेजानेसुद्धा शानदार बाॅलिंग करीत दोन विकेट घेतल्या. त्याने कमिन्स आणि मर्फीला तंबूत धाडले. उरलेल्या तळातील फलंदाजांना शमीने क्लिन बोल्ड करून कांगारूंचा डाव संपुष्टात आणला
आजची भारतीय गोलंदाजांची कामगिरी : भारतीय गोलंदाजांनी आज कांगारूंना जखडून ठेवले. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याची भेदक आणि फास्टर गोलंदाजीने आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना जखडून ठेवले. त्यांने 9 षटकांत 41 धावा दिल्या, त्यात 3 मेडन टाकत 2 विकेट घेतल्या. त्यानंतर रविचंद्रन अश्विन याने आपल्या फिरकीची कमाल कायम ठेवली आहे. त्याने 14 षटकांत 37 धावा दिल्या, तर त्यामध्ये 4 मेडन टाकून त्याने महत्त्वाच्या 2 विकेट घेतल्या. मोहम्मद शमीने डेव्हीड वाॅर्नरला झेलबाद करून आॅस्ट्रेलियाच्या संघाला पहिला सुरूंग लावला, त्यानंतर मार्नेस लाबुनशेन याला रविचंद्र अश्विनने पायचित करून पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला. त्यानंतर स्टिव्हन स्मिथला भोपळ्यावर रविचंद्रन अश्विनने झेलबाद केले, त्यानंतर शमीने हेडला झेलबाद केले.
फलंदाजांकडून अपेक्षा : नागपूर कसोटीत 120 धावा करणारा कर्णधार रोहित शर्मा वगळता भारताची आघाडीची फळी सध्या डळमळीत झाली आहे. केएल राहुल धावांसाठी झगडतो आहे. तर पुजाराकडून त्याच्या 100 व्या सामन्यात शानदार फलंदाजीची अपेक्षा आहे. विराट कोहलीकडून देखील त्याच्या घरच्या मैदानावर पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडण्याची अपेक्षा आहे. जर श्रेयस अय्यर कसोटीत खेळण्यासाठी तंदुरुस्त असेल तर भारतीय संघ त्याला या कोरड्या दिसणाऱ्या खेळपट्टीवर प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करू शकतो. फिरकीविरुद्ध भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या अय्यरने सात कसोटीत ५६.७२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र यामुळे सूर्यकुमार यादवला स्थान मिळणे कठीण होऊ शकते.
गोलंदाजी मजबूत : कसोटीत भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजाने संघाला अनेक कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलसह संघात परतलेल्या रवींद्र जडेजाच्या फलंदाजीमुळे भारताने नागपूर कसोटी जिंकली. यासह अश्विन, जडेजा आणि अक्षर या फिरकी त्रिकूटाने सामन्यात अव्वल दर्जाची गोलंदाजी देखील केली. शमी आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांनीही डावाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना झटपट पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
खेळपट्टी संथ आहे : नवी दिल्लीतील खेळपट्टी संथ असल्याने ऑस्ट्रेलियाला जर सामना पूर्ण पाच दिवस चालवायचा असेल तर त्यांना आपली फलंदाजी मजबूत करावी लागेल. 2017 मध्ये या स्टेडियमवर शेवटचा कसोटी सामना खेळला गेला, तेव्हा श्रीलंकेने हेच केले होते. पाहुण्या संघासाठी मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच धक्के बसूनही या जोडीने शानदार फलंदाजी केली होती. दुसऱ्या डावात मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव ९१ धावांत आटोपला होता. ऑक्टोबर 1996 मध्ये, दिल्लीच्या तत्कालीन फिरोजशाह कोटला मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यासह बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू झाली होती. आता, गेल्या काही वर्षांत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ आहेत. या दोन्ही संघांनी आपापल्या उणिवांवर मात केल्यास नवी दिल्लीतील चाहत्यांना एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकेल.
ऑस्ट्रेलिया तीन फिरकीपटूंसह उतरेल? : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, आम्ही तीन फिरकीपटू खेळवण्याचा विचार करतो आहे. त्यामुळे डावखुरा फिरकीपटू अॅश्टन अगर आणि मॅट कुहनमन यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. पण हे तेव्हाच होईल जेव्हा कॅमेरून ग्रीन डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसह मैदानात उतरण्यास फिट असेल. ऑस्ट्रेलियासाठी मालिकेत बरोबरी साधने कठीण जाणार आहे. विशेषत: भारताने 1987 पासून नवी दिल्लीत एकही कसोटी गमावलेली नाही.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि ईशान किशन (यष्टीरक्षक) ; ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क, मॅथ्यू रेनशॉ आणि डेव्हिड वॉर्नर.