ETV Bharat / sports

Cricketer Birthday : दिनेश कार्तिक आणि राजेश्वरी गायकवाड यांचा आज वाढदिवस

author img

By

Published : Jun 1, 2022, 5:23 PM IST

आयपीएल 2022 मध्ये धमाकेदार फलंदाजी करत दिनेश कार्तिकने ( Cricketer Dinesh Karthik ) पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये स्थान मिळवले आहे. कार्तिक आज त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचवेळी, आज भारतीय महिला क्रिकेट संघातील सदस्य राजेश्वरी गायकवाड ( Cricketer Rajeshwari Gaikwad ) हिचा वाढदिवस आहे. ती तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Karthik and Gaikwad
Karthik and Gaikwad

हैदराबाद: भारताचा अनुभवी आयपीएल 2022 मध्ये धमाकेदार फलंदाजी करत दिनेश कार्तिकने पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये स्थान मिळवले आहे. कार्तिक आज त्याचा 37वा वाढदिवस ( Cricketer Dinesh Karthik Birthday ) साजरा करत आहे. त्याचवेळी, आज भारतीय महिला क्रिकेट संघातील सदस्य राजेश्वरी गायकवाड हिचा वाढदिवस ( Birthday of Women Cricketer Rajeshwari Gaikwad ) आहे. ती तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.

डीके आज 37 वर्षांचा झाला आहे. हा वाढदिवस त्याच्यासाठी खूप खास आहे, कारण त्याने यंदा आयपीएलमध्ये अनेक स्फोटक खेळी खेळल्या आहेत. त्याच्या जोरावर तो तीन वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करत आहे. दिनेश लवकरच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवताना दिसणार आहे.

दिनेश सध्या तामिळनाडू क्रिकेट संघाचा कर्णधार ( Dinesh Kartik Captain of Tamilanadu Team ) आहे. 2004 मध्ये त्याने भारतीय संघात पदार्पण केले होते. 300 हून अधिक टी-20 सामने खेळणारा तो चौथा भारतीय खेळाडू आहे. 2007 मध्ये खराब फॉर्ममुळे दिनेशला कसोटी संघातून वगळण्यात आले. दिनेश 2018 ते 2020 या काळात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधारही होता. दिनेशच्या नावावर अनेक स्फोटक आणि संस्मरणीय खेळी असल्या तरी, फार कमी लोकांना माहीत आहे की, दिनेश कार्तिकने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी पहिला सामनावीर पुरस्कार जिंकला होता.

उजव्या हाताचा फलंदाज कार्तिकने 2021-22 मध्ये ब्रिटिश चॅनल स्काय स्पोर्ट्ससाठी समालोचक म्हणूनही काम केले. यादरम्यान भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. कार्तिकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे, तर त्याने 2007 मध्ये निकिता वंजारासोबत लग्न केले आणि नंतर 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 2008 मध्ये, दिनेश 'एक खिलाडी एक हसिना' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये निगार खानसोबत दिसला होता. यानंतर, 2013 मध्ये, दिनेशने स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलशी साखरपुडा केला आणि 2015 मध्ये लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये, दिनेश दोन जुळ्या मुलांचा पिता झाला, ज्यांची नावे कबीर आणि जियान आहेत.

महिला क्रिकेटर राजेश्वरी गायकवाड आज वाढदिवस -

  • Happy birthday to Rajeshwari Gayakwad – India’s top wicket-taker at #CWC22 🎂

    Watch all her wickets in that tournament, including a four-wicket haul against Pakistan 🔥

    — ICC (@ICC) June 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कर्नाटक राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटू असा प्रवास करणारी राजेश्वरी गायकवाड ( Women cricketer Rajeshwari Gaikwad ) आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. गायकवाडच्या परिश्रमाने तिला आज इथपर्यंत पोहोचवले आहे. जानेवारी 2014 मध्ये तिने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नोव्हेंबर 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना खेळला. त्याच स्पर्धेत तिने टी-20 मध्ये पदार्पण केले. राजेश्वरी 2017 च्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या महिला संघाचा भाग बनली.

तिच्या कुटुंबात तिला काशिनाथ आणि विश्वनाथ हे दोन भाऊ आहेत, जे बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलचे खेळाडू आहेत. याशिवाय तिला रामेश्वरी आणि भुवनेश्वरी या दोन बहिणी असून त्या हॉकीपटू आणि राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहेत. तिच्या कुटुंबातील प्रत्येकजण खेळाशी संबंधित आहे, म्हणूनच राजेश्वरीलाही हा गुण मिळाला आणि आज ती भारतीय महिला क्रिकेट संघाचा एक भाग आहे. जिथे ती गोलंदाजी करते. राजेश्वरीला भालाफेक आणि डिस्क थ्रो खेळायलाही आवडते. तिला वेळ मिळेल तेव्हा ती हे खेळही खेळते.

हेही वाचा - Sachin Tendulkar Playing XI : सचिन तेंडुलकरने निवडली आयपीएल 2022ची बेस्ट प्लेइंग इलेव्हन, विराट आणि रोहितला वगळले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.