ETV Bharat / sports

IPL मध्ये २ नवीन संघ येणार; मेगा ऑक्शन 'या' महिन्यात होणार - आयपीएल मेगा ऑक्शन

आयपीएल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआय पुढील वर्षाच्या आयपीएल हंगामात दोन नविन संघाचा समावेश करणार आहे.

http://10.10.50.85:6060///finalout4/maharashtra-nle/finalout/05-July-2021/12361513_k.jpg

author img

By

Published : Jul 5, 2021, 3:46 PM IST

मुंबई - आयपीएल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआय पुढील वर्षाच्या आयपीएल हंगामात दोन नविन संघाचा समावेश करणार आहे. ऑगस्टपर्यंत या संघाच्या निविदा बीसीसीआय मागवू शकते. दरम्यान, आतापर्यंत आठ संघ आयपीएलमध्ये खेळत होते. नविन दोन संघाचा समावेश वाढल्याने सामने वाढतील. यामुळे स्पर्धेतील रोमांच आणखी वाढणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय ऑगस्टमध्ये दोन नवीन संघांसाठी निविदा काढू शकते. हे संघ खरेदी करण्यासाठी गोएंका ग्रुप आणि अदानी ग्रुप शर्यतीत आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ फ्रेंचायझी यात पुढे आहेत. दोन नवीन संघांच्या समावेशानंतर सामन्यांची संख्याही १५ ते ३० सामन्यांनी वाढणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय डिसेंबरमध्ये आयपीएल मेगा ऑक्शन करू शकते. म्हणजेच खेळाडूंचा नव्याने लिलाव करण्यात येणार आहे. सर्व संघ ४ खेळाडू संघात कायम ठेऊ शकतील. पण यासाठी अट ठेवण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये एक परदेशी किंवा दोन देशांतर्गत व दोन परदेशी खेळाडू असणे आवश्यक आहे.

एका आयपीएल संघात जास्तीत जास्त २५ खेळाडू ठेवता येतात. आता दोन संघांचा समावेश होत असल्यामुळे नविन ५० खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल. दरम्यान, आयपीएल चौदावा हंगाम ४ मे रोजी तहकूब करण्यात आला. ६० पैकी २९ सामने झाले आहेत. उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत.

हेही वाचा - मोहम्मद अझरुद्दीनकडे पुन्हा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद

हेही वाचा - टी-२० मध्ये भारतीय क्रिकेटपटूचे तुफानी द्विशतक, १७ चेंडूत चोपल्या १०२ धावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.