ETV Bharat / sports

India Tour Of West Indies : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा ; पुजाराला डच्चू, अजिंक्य रहाणे उपकर्णधार - अजिंक्य रहाणे

12 जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि कसोटी संघात अनेक आश्चर्यकारक बदल करण्यात आले आहेत.

India Tour Of West Indies
भारताचा वेस्ट इंडिज दौरा
author img

By

Published : Jun 23, 2023, 4:15 PM IST

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात निराशाजनक प्रदर्शन करणाऱ्या उमेश यादवलाही संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

  • NEWS - India’s squads for West Indies Tests and ODI series announced.

    TEST Squad: Rohit Sharma (Capt), Shubman Gill, Ruturaj Gaikwad, Virat Kohli, Yashasvi Jaiswal, Ajinkya Rahane (VC), KS Bharat (wk), Ishan Kishan (wk), R Ashwin, R Jadeja, Shardul Thakur, Axar Patel, Mohd.… pic.twitter.com/w6IzLEhy63

    — BCCI (@BCCI) June 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यशस्वी जयस्वालला संघात स्थान : युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार यांना प्रथमच संघात स्थान मिळाले आहे. आयपीएल 2023 मधील शानदार प्रदर्शनानंतर जयस्वाल निवडकर्त्यांच्या रडारवर होता. आयपीएल मध्ये त्याने 163 च्या स्ट्राइक रेटने 625 धावा केल्या होत्या. मुंबईच्या या क्रिकेटपटूची प्रथम श्रेणीच्या 15 सामन्यांमध्ये 80.21 ची सरासरी असून त्यात त्याने 9 शतके ठोकली आहेत. 265 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

  • India’s ODI Squad: Rohit Sharma (Capt), Shubman Gill, Ruturaj Gaikwad, Virat Kohli, Surya Kumar Yadav, Sanju Samson (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya (VC), Shardul Thakur, R Jadeja, Axar Patel, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Jaydev Unadkat, Mohd. Siraj, Umran Malik, Mukesh… pic.twitter.com/PGRexBAGFZ

अजिंक्य रहाणेची उपकर्णधारपदी निवड : मोहम्मद शमीला कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही सामन्यांमधून ब्रेक देण्यात आला आहे. तर जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर आणि अजिंक्य रहाणेसह अक्षर पटेलने कसोटी संघात आपली जागा कायम राखली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर जखमी केएल राहुलचा या दौऱ्यासाठी विचार करण्यात आलेला नाही.

भारताचा पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौरा : टीम इंडियाला पुढील महिन्यात वेस्ट इंडिजच्या प्रदीर्घ दौऱ्यावर जायचे आहे. भारतीय संघ 12 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारत वेस्ट इंडिजविरुद्ध 2 कसोटी सामने, 3 एकदिवसीय सामने आणि 5 टी - 20 सामने खेळणार आहे. 5 सामन्यांच्या टी - 20 मालिकेसाठी अद्याप संघ जाहीर झालेला नाही.

कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

हेही वाचा :

  1. Womens Junior Hockey World Cup : महिला ज्युनियर हॉकी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, भारताचा पहिला सामना कॅनडाविरुद्ध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.