ETV Bharat / sports

BCB To Probe Shakib : सट्टेबाजी कंपनीला पाठिंबा देणाऱ्या शाकिबच्या पोस्टची बीसीबी करणार चौकशी

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सट्टेबाजी कंपनीच्या समर्थनार्थ शाकिबच्या अलीकडील सोशल मीडिया पोस्टची चौकशी करण्याचा निर्णय घेतला ( BCB To Probe Shakib Post ) आहे. बांगलादेशच्या सध्याच्या नियमांनुसार, कोणत्याही प्रकारच्या बेटिंग कृतींना प्रोत्साहन देणे किंवा समर्थन करणे प्रतिबंधित आहे.

Shakib
शाकिब
author img

By

Published : Aug 5, 2022, 4:31 PM IST

ढाका: बांगलादेशचा सर्वात मोठा क्रिकेटपटू शाकिब अल हसन ( Cricketer Shakib Al Hasan ) पुन्हा वादात सापडला आहे. त्याच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाने बेटिंग कंपनीच्या समर्थनार्थ त्याच्या अलीकडील सोशल मीडिया पोस्टची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारतीय बुकीच्या भ्रष्ट ऑफरची तक्रार न केल्याबद्दल शाकीबवर एक वर्षाची बंदी घातली होती. बांगलादेशच्या सध्याच्या नियमांनुसार, कोणत्याही प्रकारच्या बेटिंग प्रकरणाला प्रोत्साहन देणे किंवा समर्थन करणे प्रतिबंधित आहे.

शाकिबला कारणे दाखवा नोटीस देण्यात -

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्ड ( Bangladesh Cricket Board ) अष्टपैलूच्या अलीकडील सोशल मीडिया पोस्टची चौकशी करेल. ज्यामध्ये त्याने 'बेटविनर न्यूज' ( Betwinner News ) नावाच्या कंपनीसोबत भागीदारी जाहीर केली होती. बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन म्हणाले की, शाकिबला कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल. शाकिबने जवळपास 400 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये 12,000 हून अधिक धावा आणि 650 विकेट्स घेतल्या आहेत.

शाकिबच्या सोशल मीडिया पोस्टची चौकशी करण्याचा निर्णय -

नजमुल म्हणाले, दोन गोष्टी आहेत. अशी परवानगी आम्ही देणार नसल्याने पहिली परवानगी घेण्याची शक्यता नाही. आम्ही सट्टेबाजीशी संबंधित काहीही होऊ देणार नाही. याचा अर्थ त्यांनी आम्हाला परवानगी देण्यास सांगितले नाही. दुसरे म्हणजे, त्यांनी करारावर स्वाक्षरी केली आहे की नाही हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. बीसीबीची गुरुवारी बैठक झाली ज्यामध्ये शाकिबच्या सोशल मीडिया पोस्टची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात ( Shakib Post Supporting Betting Company ) आला.

नजमुल म्हणाले, हा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला आणि आम्ही सांगितले की ते अशक्य आहे. कारण ते कसे होऊ शकते. असे झाले असेल तर लगेच त्याला विचारावे लागेल. त्याला नोटीस बजावून बोर्ड परवानगी देत ​​नसल्याने हे सर्व कसे घडले याची विचारणा केली जाईल. हे सट्टेबाजीशी संबंधित आहे आणि आम्ही त्याला परवानगी देणार नाही.

हेही वाचा - CWG 2022 Womens Cricket : उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्‍चित; कधी, कुठे आणि केव्हा होणार सामने, घ्या जाणून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.