ETV Bharat / sports

Australia Tour of Sri Lanka: ऑस्ट्रेलियन संघ जून-जुलैमध्ये श्रीलंकेचा दौरा करणार; दौऱ्यात टी-20, वनडे आणि कसोटी मालिकेचा समावेश - श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ ( Australian cricket team ) 2016 नंतर प्रथमच या वर्षी जून-जुलैमध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे. ज्यामध्ये ते दोन कसोटी सामन्यांसह एकूण 10 सामने खेळणार आहेत.

Sri Lanka
Sri Lanka
author img

By

Published : Mar 25, 2022, 7:10 PM IST

कोलंबो: यंदा ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर ( Australia tour of Sri Lanka ) जाणार आहे. ऑस्ट्रे्लिया संघाचा हा दौरा जून आणि जुलै महिन्यात आहे. ऑस्ट्रेलियन संघ 2016 सालानंतर प्रथमच श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेने होईल. त्यानंतर पाच सामन्याची वनडे मालिका खेळली जाईल. त्यानंतर या दौऱ्याची सांगता दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने होईल. टी-20 आणि वनडे मालिकेची होस्टिंगचे अधिकार कोलंबोचे आर. प्रेमदासा स्टेडियम आणि कँडीमधील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम दरम्यान सामायिक केले जाईल.

तसेच श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Sri Lanka v Australia ) संघातील कसोटी मालिका 29 जून ते 3 जुलै आणि 8 ते 12 जुलै दरम्यान गॅले येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. त्याचबरोबर ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे. तसेच 2016 च्या श्रीलंका दौऱ्यात ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका 3-0 ने गमावली होती. परंतु या पाहुण्या संघाने एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करून 4-1 ने जिंकली होती. त्यानंतर टी-20 मालिकेमध्ये 2-0 असा क्लीन स्वीप दिला होता.

श्रीलंका क्रिकेटचे सीईओ ऍशले डी सिल्वा ( CEO Ashley de Silva ) म्हणाले, "आम्ही या दौऱ्याबद्दल रोमांचित आहोत. ऑस्ट्रेलियाने या अगोदर पाच वर्षापूर्वी श्रीलंका दौरा केला होता. टी-20 मालिका आम्हाला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत मदत करेल, तर कसोटी आणि ODI देखील आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. कारण आमचे लक्ष्य आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत वर जाणे आणि 2023 मध्ये आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरणे आहे. तसेच यासाठी आम्हाला तयारही असायला हवं.

ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा -

7 जून: पहिला T20, कोलंबो

8 जून: दुसरी टी२०, कोलंबो

11 जून: तिसरा T20, कॅंडी

14 जून: पहिली एकदिवसीय, कॅंडी

16 जून: दुसरी वनडे, कॅंडी

19 जून: तिसरी वनडे, कोलंबो

21 जून: चौथा एकदिवसीय, कोलंबो

24 जून: पाचवा वनडे, कोलंबो

29 जून - 3 जुलै: पहिली कसोटी, गॅले

8-12 जुलै: दुसरी कसोटी, गॅले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.