ऑकलंड - महिला विश्वचषकात ( ICC Womens World Cup 2022 ) ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेट्सने मात केली ( Australia Beat India By 6 Wickets ) आहे. विश्वचषकातील 5 मधील तीन सामन्यांत भारताला हार पत्करावी लागली आहे. भारतीय संघाने दिलेल्या 278 धावांचा पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने पाचवा विजय नोंदवला आहे. मिताली राज 68, यास्तिका भाटिया 59, हरमनप्रित कौर 57 या तिघींनी अर्धशतकी खेळी केली आहे.
भारतीय संघाने 278 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया समोर ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना रॅचल हॅस (43), एलिसा हीली (72) या दोघींनी 121 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कॅप्टन मॅग लेनिंगने 107 चेंडूत 97 धावा केल्या. मेघनाने तिची विकेटस घेतील मात्र, तोपर्यंत सामना भारताच्या हातातून गेला होता. या तीन महिला खेळाडू शिवाय एलिस पेरी (28), बेथ मूनीने (30) धावा ठोकल्या.
भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. स्मृती मंधाना (10), शफाली वर्मा (12) धावांवर माघारी परतल्या. परंतु, त्यानंतर कर्णधार मिताली राजने ( 68) आणि यस्तिका भाटियाने (58) धावा केल्या. या सामन्यात अर्धशतक ठोकत मिताली विश्वचषकात 50 हून अधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे. आतापर्यंत मितालीने विश्वचषकात १२ अर्धशतके झळकावली आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन महिला संघाने पाच पैकी पाच सामने जिंकत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. तर, दोन सामन्यांतील विजय आणि 4 गुणांसह भारतीय महिला संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिकेवर मात करत गुणतालिकेत राहण्यासाठी भारतीय महिला संघाला दमादर कामगिरी करावी लागणार आहे.