हांगझोऊ : श्रीलंकेच्या मधल्या फळीतील फलंदाज हसिनी परेरा (25) आणि निलाक्षी डी सिल्वा (23) यांनी सुरेख खेळी करत श्रीलंकेला विजयाच्या उंबरठ्याजव पोहोचण्यास मदत केली. मात्र, भारतीय महिला गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या विजयाचं स्वप्न धुळीस मिळालं.
प्रथम फलंदाजी करताना स्मृती आणि जेमिमाह यांनी अनुक्रमे 46 आणि 42 धावा करून धावांचा डोंगर रचला. जेमिमाह रॉड्रिग्जनेही 40 चेंडूत 42 धावांचे योगदान दिले. शेफाली वर्मा 9 धावांवर लवकर बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौरलाही केवळ 2 धावा करता आल्या. शेफाली वर्मा आणि जेमिमा यांनी ७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केल्यानं भारतीय संघ 116 धावांपर्यंत पोहोचला.
-
Gold for India 🥇
— ICC (@ICC) September 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Harmanpreet Kaur’s side beat Sri Lanka in the thrilling #AsianGames Women’s T20I Final 🔥
📝 https://t.co/NdufO4iSlY pic.twitter.com/ft5ZkihyJu
">Gold for India 🥇
— ICC (@ICC) September 25, 2023
Harmanpreet Kaur’s side beat Sri Lanka in the thrilling #AsianGames Women’s T20I Final 🔥
📝 https://t.co/NdufO4iSlY pic.twitter.com/ft5ZkihyJuGold for India 🥇
— ICC (@ICC) September 25, 2023
Harmanpreet Kaur’s side beat Sri Lanka in the thrilling #AsianGames Women’s T20I Final 🔥
📝 https://t.co/NdufO4iSlY pic.twitter.com/ft5ZkihyJu
- भारताच्या वेगवान गोलंदाज साधूनं चार षटकांत ६ धावा देत श्रीलंकेचे तीन विकेट घेऊन श्रीलंकेला शरणागती पत्करायला लावली. राजेश्वरी गायकवाडने दोन बळी घेत भारताचा विजय सुकर केला. दीप्ती शर्मा, देविका वैद्य आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
-
चक दे इंडिया...
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेट विभागात भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत श्रीलंकन महिला क्रिकेट संघाचा पराभव करीत #सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
आपल्या देदीप्यमान कामगिरीच्या माध्यमातून भारतीय महिला क्रिकेट संघाने चीन येथील हांगझोऊ येथे भारतीय… pic.twitter.com/lndlhJevXl
">चक दे इंडिया...
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 25, 2023
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेट विभागात भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत श्रीलंकन महिला क्रिकेट संघाचा पराभव करीत #सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
आपल्या देदीप्यमान कामगिरीच्या माध्यमातून भारतीय महिला क्रिकेट संघाने चीन येथील हांगझोऊ येथे भारतीय… pic.twitter.com/lndlhJevXlचक दे इंडिया...
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 25, 2023
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेट विभागात भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत श्रीलंकन महिला क्रिकेट संघाचा पराभव करीत #सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
आपल्या देदीप्यमान कामगिरीच्या माध्यमातून भारतीय महिला क्रिकेट संघाने चीन येथील हांगझोऊ येथे भारतीय… pic.twitter.com/lndlhJevXl
- राजेश्वरीनं अखेरच्या षटकात केलेल्या गोलंदाजीनं भारताला विजय मिळवून दिला. राजेश्वरी गायकवाडने शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करत कुमारीला त्रिफळाचीत केले. राजेश्वरीने 1 धाव देत भारताला 19 धावांनी विजय मिळवून दिला. यासह भारतीय महिला संघाने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. देविका वैद्यनं श्रीलंकेच्या फलंदाजांना आक्रमक होण्याची संधी दिली नाही. देविकानं 19व्या षटकात 5 धावा दिल्या आहेत. यासोबतच देविकानं 5 धावांच्या स्कोअरवर कविशा दिलहरीला रिचा घोषच्या हातून बाद केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला क्रिकेट संघाचं केलं कौतुक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडिया एक्समध्ये पोस्ट करत भारतीय महिला संघाचं कौतुक केलय. त्यांनी म्हटलं की, चक दे इंडिया... आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेट विभागात भारतीय महिला क्रिकेट संघानं अंतिम फेरीत श्रीलंकन महिला क्रिकेट संघाचा पराभव करीत #सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं. आपल्या देदीप्यमान कामगिरीच्या माध्यमातून भारतीय महिला क्रिकेट संघानं चीन येथील हांगझोऊ येथे भारतीय तिरंगा फडकवला आहे. या ऐतिहासिक एशियाड क्रिकेट सुवर्ण कामगिरीचा आम्हा सर्व भारतवासिंयांना आपला सार्थ अभिमान आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा.
- बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडून संघाचं अभिनंदन- भारतीय महिला क्रिकेट संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेत 18 वर्षीय तितास साधूच्या गोलंदाजीच्या बळावर (6 गडी बाद 3 बळी) श्रीलंकेवर विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल संघाचे आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन, असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केले.
हेही वाचा-