ETV Bharat / sports

Asian Game 2023 : उपांत्य सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचं विजयी 'तिलक', अंतिम फेरीत प्रवेश करत केलं पदक निश्चित - फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर

Asian Game 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघानं उपांत्य फेरीत बांगलादेशवर शानदार विजय संपादन करत भारतानं अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत भारतीय खेळाडू सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील.

Asian Game 2023
Asian Game 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 1:09 PM IST

हांगझोऊ Asian Game 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं सुवर्णपदक जिंकलंय. आता भारतीय पुरुष संघही त्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचलाय. आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघांनी चमकदार कामगिरी केलीय. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतानं नेपाळचा पराभव केला होता. त्यानंतर आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं बांगलादेशला दणदणीत पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवलाय. यामुळं आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं आणखी एक पदक निश्चित झालंय.

नाणेफेक जिंकून गोलंदाजी : भारतानं या उपांत्य सामन्यात नाणेफेक जिंकत बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. प्रथम फलंदाजीला आलेला बांगलादेशचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर अक्षरशः झुंजताना दिसला. त्यांना 20 षटकांत केवळ 96 धावाच करता आल्या. भारतीय संघाकडून रविनिवासन साई किशोरनं सर्वाधिक ३ बळी घेतले. तर फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला 2 तिलक वर्माला एक विकेट घेता आली.

धावांचा वेगवान पाठलाग : अवघ्या 96 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघानं पहिली विकेट लवकरच गमावली. गेल्या सामन्यात शानदार शतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल एकही धाव न काढता बाद झाला. यानंतर आलेल्या तिलक वर्मानं ताबडतोड 55 धावांची शानदार खेळी करत संघाला विजयाकडं नेलं. त्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारतानं अवघ्या 9.2 षटकांत ही धावसंख्या गाठली. भारतीय संघानं आपल्या डावात 9 षटकार मारत अर्ध्याहून अधिक धावा केल्या आहेत. कर्णधार ऋतुराज गायकवाडनंही 35 धावांची शानदार खेळी केली. सुवर्णपदकासाठी भारताचा पुढील अंतिम सामना उद्या होणार आहे. सध्या दुसरा उपांत्य सामना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असून यातील विजेत्या संघासोबत भारतीय संघ अंतिम सामन्यात सुवर्ण पदकासाठी मैदानात उतरेल.

हेही वाचा :

  1. Asian Games २०२३ : तिरंदाजीच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकून ओजसनं नागपूरकरांना दिली 'सुवर्णभेट'
  2. Asian Games 2023 : मराठमोळ्या अविनाशची 'गोल्डन' कामगिरी; 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण पदक
  3. Asian Games 2023 : हॉकीत भारतानं पाकिस्तानला धुतलं, नोंदवला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.