ETV Bharat / sports

Anushka Sharma on Virat Kohli : 'विराट' खेळीनंतर नवऱ्यासाठी अनुष्का शर्माची खास पोस्ट; बर्थडे पर खुद को... - anushka sharma

Anushka Sharma on Virat Kohli : क्रिकेटमधला फलंदाजीचा किंग विराट कोहलीनं आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात विराटनं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं आपलं 49वं शतक ठोकलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केलीये. यानंतर विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मानं प्रतिक्रिया दिली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 7:37 PM IST

Updated : Nov 5, 2023, 7:56 PM IST

मुंबई Anushka Sharma on Virat Kohli : विराटनं 121 चेंडूंमधली नाबाद 101 धावांची खेळी (Virat Kohli 49 Century) केली. यात त्याने दहा चौकारही ठोकले आहेत. विराट कोहलीनं शतक ठोकल्यानंतर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. अनुष्का शर्मानं पती विराट कोहलीच्या शतकानंतर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. विशेष म्हणजे विराटचा रविवारी (5 नोव्हेंबर) वाढदिवसही आहे. त्याबाबतची अनुष्कानं सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली होती.

अनुष्का शर्माकडून विराटचं कोतुक : विश्वचषकात दोन वेळा विराट कोहलीला शतकानं गवसणी घातली होती. याआधी तो 95 आणि 88 धावांवर आऊट झाला होता. त्यानंतर लगेचच कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर विराट कोहलीनं शतक ठोकलंय. विराट कोहलीनं आपल्या 35 व्या वाढदिवसाला 49 व्या शतकाला गवसणी घातली. विराट कोहलीचे शतक झाल्यानंतर अनुष्का शर्मानं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेयर करत विराटचं कौतुक केलंय.

अनुष्का शर्माची पती विराटसाठी पोस्ट : अनुष्का शर्मानं तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीजमध्ये विराटचा फोटो अपलोड केलाय. 'स्वतःच्या वाढदिवसाला शतक ठोकत स्वतःला गिफ्ट दिलंय' असं कॅप्शनही अनुष्का शर्मानं पती विराटसाठी दिलंय. सध्या अनुष्का शर्माची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Anushka Sharma
अनुष्का शर्माची पोस्ट

विराट कोहली ट्रेंडिंग : रविवारी विराट कोहलीचा वाढदिवस आहे. ितसेच त्यानं 49 वे शतक ठोकत क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. त्यामुळं विराट कोहली सर्वच सर्च इंजिन प्लॅटफॉमवर नंबर वन ट्रेंडिंगमध्ये आहे. तसेच नेटकऱ्यांकडूनही विराट कोहलीचे सोशल मीडियावर कोतुक केलं जात आहे. सचिन तेंडुलकरनंही विराट कोहलीला खास शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा -

  1. Virat Kohli : कोहलीचा 'विराट' पराक्रम, सचिनच्या ४९ शतकांची बरोबरी
  2. Virat Kohli : शतकांच्या विक्रमाची बरोबरी करताच सचिनच्या विराटला अनोख्या शब्दात शुभेच्छा!
  3. Shreyas Iyer Father Interview : श्रेयस अय्यरच्या वडिलांसोबत 'ईटीव्ही भारत'चा 'वन टू वन'; सांगितली अनेक गुपितं

Last Updated : Nov 5, 2023, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.