ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कची क्रिकेटर पत्नी एलिसा हिलीची रोहित शर्मावर नजर - Rohit Sharma

भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघात 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि एक कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. उभय संघातील मालिकेला सुरूवात होण्याआधी ऑस्ट्रेलियाची फलंदाज एलिसा हिली हिने रोहित शर्माविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Alyssa Healy wants to replicate Rohit Sharma's success across formats
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कची क्रिकेट पत्नी एलिसा हिलीची रोहित शर्मावर नजर
author img

By

Published : Sep 15, 2021, 3:20 PM IST

मेलबर्न - भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघात 21 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. यात तीन एकदिवसीय, एक कसोटी आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. उभय संघातील या मालिकांसाठी ऑस्ट्रेलियाची दिग्गज एलिसा हिली सज्ज झाली आहे. यासोबत तिची नजर भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मावर आहे.

एलिसा हिली याचा नवरा ऑस्ट्रेलिया पुरूष संघाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आहे. स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 61 कसोटी, 99 एकदिवसीय आणि 41 टी-20 सामने खेळली आहेत. यात त्याने अनुक्रमे 255, 195 आणि 51 गडी बाद केले आहेत. याशिवाय त्याने फलंदाजीत कसोटीत 1 हजार 596, एकदिवसीयमध्ये 428 आणि टी-20 त 70 धावा केल्या आहेत. तर त्याची पत्नी एलिहा हिली याने फक्त 4 कसोटी सामने खेळली आहेत. तर टी-20 क्रिकेटमध्ये ती नवऱ्यापेक्षा जास्त अनुभवी आहे.

एलिसा हिलीची कसोटीत सर्वोच्च धावसंख्या 58 इतकी आहे. एकदिवसीयमध्ये तिचा हा आकडा 133 आहे. याशिवाय टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तिने नाबाद 148 धावांची खेळी केली होती. तिने 79 एकदिवसीय, 118 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहेत. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ एक कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी एलिसा हिलीची निवड ऑस्ट्रेलिया संघात आहे. ती एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाची सलामीवीर आहे. अशात तिची नजर रोहित शर्मावर असणे सहाजिक आहे.

एलिसा हिली फॉक्स क्रिकेट सोबत बोलताना म्हणाली, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेदरम्यान, कसोटी फॉर्मेटची तयारी करणे आव्हानात्मक होईल. हे काम खूप कठिण आहे. कारण माझ्याकडे फक्त चार कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. पण मी कसे खेळू याचा विचार करत बसणार नाही. याला मी सहज घेईन. मला वाटत की, स्वत:ला अधिक वेळ देण्याची क्षमता वाढवावी लागेल.

मी जेव्हा आधुनिक कसोटी क्रिकेटकडे पाहते तेव्हा मला कळते की, यात कसे बदल झाले आहेत. मी खूप साऱ्या पुरूष क्रिकेटर्संना पाहते. यात खासकरून मी रोहित शर्मासारख्या क्रिकेटरना पाहत असते. रोहित व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जगातील सर्वात धाकड फलंदाजांपैकी एक आहे. यासोबत तो कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी सलामीवीर फलंदाज आहे. यामुळेच माझी नजर त्याच्यासारख्या क्रिकेटरवर आहे. रोहित आपले कौशल्य क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटनुसार बदलतो. मी त्याच्यासारखी कामगिरी कशी करू शकते, याचा विचार मी करत असते, असे देखील एलिसा हिली हिने सांगितलं.

दरम्यान, यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिली हिने महेंद्रसिंग धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे. तिने महिला टी-20 क्रिकेटमध्ये यष्ट्यामागे 97 गडी बाद केले आहेत. यात 46 झेल आणि 51 स्टम्पिंग आहेत. महेंद्रसिंग धोनीने 13 वर्षांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 91 गडी बाद केले. यात 57 झेल आणि 34 स्टम्पिंगचा समावेश आहे.

हेही वाचा - यॉर्कर स्पेशालिस्ट लसिथ मलिंगाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

हेही वाचा - IPL 2021: कमी अलविदा ना कहना! अनिल कुंबळे, वसीम जाफर यांनी गायलं गाणं, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.