लखनौ - सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्मा आणि रितूपर्णा दास यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. तर भारताचा स्टार खेळाडू किदम्बी श्रीकांतचे आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले आहे.
यावर्षी हैदराबाद आणि व्हिएतनाम येथील दोन 'बीडब्ल्यूएफ सुपर १००' दर्जाच्या स्पर्धा जिंकणाऱ्या २६ वर्षीय सौरभने थायलंडच्या कुणलावत वितिदसर्नचा २१-१९, २१-१६ असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्यांची गाठ कोरियाच्या हीओ क्वांग ही याच्याशी होणार आहे.
किदाम्बी श्रीकांतची वाटचाल सन वॉन हू याने रोखली. तिसऱ्या मानाकिंत श्रीकांतचा सातव्या मानांकित सन वॉनने २१-१८, २१-१९ असा पराभव केला. महिला गटाच्या एकेरीत माजी राष्ट्रीय विजेत्या रितूपर्णाने भारताच्याच श्रुती मुंदडाचा २४-२६, २१-१०, २१-१९ असा पराभव केला. रितूपर्णाची शनिवारी उपांत्य फेरीत थायलंडच्या फिटायापोर्न चायवानशी गाठ पडणार आहे.
हेही वाचा - सायनाने शेअर केला आपल्या बायोपिकचा 'फर्स्ट लुक', परिणीतीला दिल्या शुभेच्छा!
हेही वाचा - 'सुवर्ण'सिंधूचा वर्कआऊट पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, 'मी व्हिडिओ पाहूनच थकलो'
हेही वाचा - 'तिरंग्या'ची शान वाढवणाऱ्या महिलांचा सन्मान, 'पद्म'साठी ९ महिला खेळाडूंची शिफारस