मुंबई - भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि दाक्षिणात्य स्टार विष्णू विशाल यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. अभिनेता विष्णू विशालने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही बातमी दिली.
विष्णू आणि ज्वाला या वर्षाच्या सुरूवातीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता ज्वालाच्या वाढदिवसानिमित्त विष्णूने तिला लग्नासाठी प्रपोज करत साखरपुड्याची अंगठी दिली.
-
Happy birthday @Guttajwala
— VISHNU VISHAL - stay home stay safe (@TheVishnuVishal) September 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
New start to LIFE..
Lets be positive and work towards a better future for us,Aryan,our families,friends and people around..
Need all your love n blessings guys..#newbeginnings
thank you @basanthjain for arranging a ring in d middle of d night.. pic.twitter.com/FYAVQuZFjQ
">Happy birthday @Guttajwala
— VISHNU VISHAL - stay home stay safe (@TheVishnuVishal) September 7, 2020
New start to LIFE..
Lets be positive and work towards a better future for us,Aryan,our families,friends and people around..
Need all your love n blessings guys..#newbeginnings
thank you @basanthjain for arranging a ring in d middle of d night.. pic.twitter.com/FYAVQuZFjQHappy birthday @Guttajwala
— VISHNU VISHAL - stay home stay safe (@TheVishnuVishal) September 7, 2020
New start to LIFE..
Lets be positive and work towards a better future for us,Aryan,our families,friends and people around..
Need all your love n blessings guys..#newbeginnings
thank you @basanthjain for arranging a ring in d middle of d night.. pic.twitter.com/FYAVQuZFjQ
विशालने ज्वालासोबतचा साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्याने, वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्वाला. आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. सकारात्मक राहुयात आणि आपल्या दोघांच्या उत्तम भविष्यासाठी मिळून प्रयत्न करुयात. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि प्रेम राहू द्या, असे म्हटलं आहे.
- View this post on Instagram
My lovelies ❤️ always loving me so much..... How lucky am I to have them in my life!!
">
दरम्यान, विष्णू हा तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने २००९ मध्ये करिअरला सुरुवात केली. २०११ मध्ये त्याने रजनी नटराजनशी लग्न केलं होते. मात्र हे नाते फार काळ टिकू शकले नाही. दुसरीकडे ज्वाला गुट्टाने बॅडमिंटन खेळाडू चेतन आनंदशी संसार थाटला होता. पण दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने त्यांनी एकमेकांपासून वेगळे होणे पसंत केले.
हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये ज्वालाला येतेय बॉयफ्रेंडची आठवण, शेअर केले रोमँटिक फोटो
हेही वाचा - कोरोनाविरुद्धची लढाई : पवन कल्याणकडून २ कोटींची मदत, सिंधूचाही मदतीचा हात