फुल्टन - भारताचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने भारताच्याच एचएस प्रणॉयला हरवत यूएस ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. अवघ्या 50 मिनिटांमध्ये सौरभने प्रणॉयला हरवत हा सामना खिशात घातला.
शुक्रवारी खेळल्या गेलेल्या या क्वार्टर फायनलमध्ये सौरभने प्रणॉयवर 21-19, 23-21 अशी मात केली. या विजयाबरोबरच सौरभने प्रणॉयविरुद्ध 4-0 असे समीकरण केले आहे. 2017 च्या इंडियन ओपनमध्ये सौरभने एचएस प्रणॉयला हरवले होते.
या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये थाईलंडच्या तानोंगसाक सीनसोमबूनसुकशी सौरभची लढत होणार आहे.