ETV Bharat / sports

सायनाने शेअर केला आपल्या बायोपिकचा 'फर्स्ट लुक', परिणीतीला दिल्या शुभेच्छा!

author img

By

Published : Oct 7, 2019, 10:22 PM IST

सायनाने आपल्या बायोपिकमधील परिणीतीच्या लुकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत सायनाने परिणीती आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ११ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.

सायनाने शेअर केला आपल्या बायोपिकचा 'फर्स्ट लुक', परिणीतीला दिल्या शुभेच्छा...!

मुंबई - भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्यावर आता लवकरच बायोपिक येणार आहे. या चित्रपटामध्ये सायनाच्या भूमिकेत अभिनेत्री परिणीती चोप्रा झळकणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून तत्पूर्वी सायनाने परिणीला शुभेच्छा दिल्या आहेत.

सायनाने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन परिणीतीच्या लुकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत सायनाने परिणीती आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ११ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.

दरम्यान, या बायोपिकचे दिग्दर्शन अमोल गुप्त करणार आहेत. तर भूषण कुमार निर्देशनाची जबाबदारी पार पाडत आहेत. या चित्रपटासाठी परिणीती मागील सहा महिन्यांपासून बॅडमिंटनचा सराव करत आहे. परिणीतीने या चित्रपटाविषयी उत्सुक असल्याचे सांगितले आहे. हा चित्रपट २०२० मध्ये पार पडणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेपूर्वी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

सायना नेहवालच्या या बायोपिकच्या नावाबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. परिणीतीच्या आधी श्रध्दा कपूर सायनाची भूमिका साकारणार होती. मात्र, काही कारणांमुळे तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला.

हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी

हेही वाचा - 'तिरंग्या'ची शान वाढवणाऱ्या महिलांचा सन्मान, 'पद्म'साठी ९ महिला खेळाडूंची शिफारस

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.