बर्मिंगहॅम - ऑल इंडिया इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आले. यामुळे सामनाचे टोकियो ऑलिम्पिकचे स्वप्न धोक्यात आले आहे.
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत सायनाचा जपानच्या आका यामागुचीने २१-११, २१-०८ अशा फरकाने पराभव केला. यामागुचीने अवघ्या २८ मिनिटात सायनाचे आव्हान मोडून काढले. सायनाला या पराभवामुळे आता अन्य महत्वाच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. अन्यथा तिच्या ऑलिम्पिकच्या अभियानाला धक्का बसू शकतो.
सायनाला ऑलिम्पिक पात्रतेसाठी चांगली कामगिरी करावी लागेल. तिला स्विस ओपन (१७ ते २२ मार्च ), इंडिया ओपन (२४ ते २९ मार्च) आणि मलेशिया ओपन (२१ मार्च ते ५ एप्रिल) या स्पर्धेत चांगली कामगिरी करून ऑलिम्पिकचे तिकीट मिळण्याची संधी आहे.
बॅडमिंटन विश्वात मानाची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. भारताच्या पी. व्ही. सिंधूने या स्पर्धेत विजयी सुरुवात करत दुसरी फेरी गाठली आहे. तिने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या झांग बिविन हिचा २१-१४, २१-१७ अशा धुव्वा उडवला आहे. दरम्यान, सिंधूचा ऑलिम्पिक प्रवेश जवळपास निश्चित आहे.
हेही वाचा - All England Championships : सिंधूची विजयी सुरुवात, चोपडा-रेड्डी जोडीचे आव्हान संपुष्टात
हेही वाचा - BCCI ची कोंडी, IPL २०२० विषयावर उच्च न्यायालयाने दिले 'हे' आदेश