ओडेन्से (डेन्मार्क) - भारताची 'फुलराणी' सायना नेहवाल सध्या सुरू असलेल्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत गारद झाली आहे. महिला एकेरीच्या या सामन्यात सायनाला जपानच्या सायाका ताकाहाशीने १५-२१, २१-२३ असे पराभूत केले.
-
Breaking News:
— India_AllSports (@India_AllSports) October 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Saina Nehwal crashes OUT in 1st round of Denmark Open; Goes down to World No. 11 Sayaka Takahashi 15-21, 21-23. #DenmarkOpen2019 pic.twitter.com/bOYlv1kL2b
">Breaking News:
— India_AllSports (@India_AllSports) October 16, 2019
Saina Nehwal crashes OUT in 1st round of Denmark Open; Goes down to World No. 11 Sayaka Takahashi 15-21, 21-23. #DenmarkOpen2019 pic.twitter.com/bOYlv1kL2bBreaking News:
— India_AllSports (@India_AllSports) October 16, 2019
Saina Nehwal crashes OUT in 1st round of Denmark Open; Goes down to World No. 11 Sayaka Takahashi 15-21, 21-23. #DenmarkOpen2019 pic.twitter.com/bOYlv1kL2b
हेही वाचा - खिल्ली उडवणाऱ्या नेटकऱ्याला मितालीने दिले सडेतोड उत्तर
दुसरीकडे, पुरुषांच्या एकेरीमध्ये समीर वर्माने पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे. समीरने जपानच्या केंटा सुनेयामाला २१-११, २१-११ असे पराभूत केले. समीरने २९ मिनिटांमध्येच हा विजय मिळवला. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की यांच्या जोडीने जर्मनीच्या मार्विन सेईडेल आणि लिंडा इफेअर यांना २१-१६, २१-११ असे हरवले.
पुरूष दुहेरीत भारतीय जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी विजयी प्रारंभ केला आहे. त्यांनी कोरियाच्या किम जी जुंग व ली योग डेई या जोडीचा २४-२२, २१-११ ने पराभव केला. तर, जगज्जेती पी. व्ही. सिंधूने पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुंजुंगचा पराभव केला. हा सामना रोमांचक ठरला. मात्र, यात सिंधूने २२-२०, २१-१८ ने बाजी मारत या खेळाडूविरुद्धचा शंभर टक्के विजयाचा रेकॉर्ड कायम राखला.