नवी दिल्ली - भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधुला कोरिया ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत मोठा धक्का बसला आहे. महिलांच्या एकेरीत सिंधुला पहिल्याच फेरीत गारद व्हावे लागले.
हेही वाचा - लंकेचे खेळाडू पाकिस्तानात दाखल, मिळाली 'झेड-प्लस' सुरक्षा
जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या बिएवेन झांगने सिंधुला मात दिली. तिने ऑलिम्पिक विजेत्या सिंधुला ७-२१, २४-२२, २१-१५ असे हरवले. नुकत्याच झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधुने सुवर्णपदक जिंकले होते.
झांग आणि सिंधु यांच्यातील हा सामना ५६ मिनिटे चालला. आधी झालेल्या चार लढतींपैकी झांगचा हा पहिलाच विजय आहे. सिंधु लागोपाठ दुसऱ्या स्पर्धेतून लवकर बाहेर पडली आहे. २४ वर्षीय सिंधुने मागच्या आठवड्यात झालेल्या चीन ओपन सुपर १००० स्पर्धेत पराभव पत्करला होता.
या सामन्यात सिंधुला थायलंडच्या पोर्नपावे चोचूवोंगने हरवले होते.