ETV Bharat / sports

ऑल इंग्लंड ओपन : ओकुहाराकडून सिंधू पराभूत

या स्पर्धेत आव्हान टिकवलेली सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू होती. याआधी लक्ष्य सेन आणि महिला दुहेरीची जोडी अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी हे स्पर्धेबाहेर झाले आहेत.

author img

By

Published : Mar 14, 2020, 7:49 AM IST

PV Sindhu lost to Okuhara in quarter finals of all england open
ऑल इंग्लंड ओपन : ओकुहाराकडून सिंधू पराभूत

बर्मिंगहॅम - भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडावे लागले आहे. जपानच्या नोझोमी ओकुहाराने सिंधूला १२-२१, २१-१५, २१-१३ असे हरवले. हा सामना ६८ मिनिटे सुरू होता.

हेही वाचा - ISL FINAL : एटीके एफसी आणि चेन्नई एफसी यांच्यात रंगणार द्वंद्व

या स्पर्धेत आव्हान टिकवलेली सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू होती. याआधी लक्ष्य सेन आणि महिला दुहेरीची जोडी अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी हे स्पर्धेबाहेर झाले आहेत. जपानच्या मिसाकी मात्सुतोमो आणि अयाका तकाहाशीने पोनप्पा-रेड्डीला १३-२१, १४-२१ अशी मात दिली.

लक्ष्य सेन बाहेर -

भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत पराभूत झाल्यानंतर लक्ष्यचे आव्हान संपुष्टात आले आहे. डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसेनने लक्ष्यला २१-१८, २१-१८ असे पराभूत केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.