ETV Bharat / sports

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : पी. व्ही. सिंधु व साईप्रणीत यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक - किदम्बी श्रीकांत

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधुने तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या बेईवन झांग हिला २१-१४, २१-६ असे सहज हरवले. तर, दुसरीकडे, भारताच्या १६ व्या मानांकित बी. साईप्रणीतने  इंडोनेशियाच्या अँथनी जिनटिंग याला २१-१९, २१-१३ असे हरवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : पी. व्ही. सिंधु आणि साईप्रणीत यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक
author img

By

Published : Aug 23, 2019, 12:11 PM IST

बासेल - भारताचे स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु आणि साईप्रणीत यांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या दोन्ही खेळाडूंनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या दोघांव्यतिरिक्त सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत हे खेळाडू स्पर्धेबाहेर पडले आहेत.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधुने तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या बेईवन झांग हिला २१-१४, २१-६ असे सहज हरवले. सिंधुने हा सामना ३४ मिनिटांत जिंकला. उपांत्यपूर्व फेरीत सिंधुचा सामना चीनच्या ताय झू यिंगसोबत होणार आहे. तिच्यासोबतचा सिंधुचा विजयाचा आलेख १०-४ असा आहे.

तर, दुसरीकडे भारताच्या १६ व्या मानांकित बी. साईप्रणीतने इंडोनेशियाच्या अँथनी जिनटिंग याला २१-१९, २१-१३ असे हरवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अँथनी हा जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर आहे. उपांत्यपूर्व फेरीत साईप्रणीतचा सामना इंडोनेशियाच्या जोनाटन क्रिस्टिलीसोबत होणार आहे.

सातव्या मानांकित किदांबी श्रीकांत याला थायलंडच्या १२व्या मानांकित कँटाफोन वँगचॅरेओन याने १४-२१, १३-२१ असे हरवले. तर, माजी ऑलिम्पिक विजेत्या लिन डॅनला दुसऱ्या फेरीत हरवणाऱ्या प्रणॉयचे आव्हान जपानच्या केंटो मोमोटा याने संपुष्टात आणले.

Intro:Body:

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : पी. व्ही. सिंधु आणि साईप्रणीत यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

बासेल - भारताचे स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु आणि साईप्रणीत यांनी आपली विजयी घो़डदौड कायम ठेवली आहे. या दोन्ही खेळाडूंनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या दोंघाव्यतिरिक्त सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत हे खेळाडू स्पर्धेबाहेर पडले आहेत.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधुने तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या बेईवन झांग हिला २१-१४, २१-६ असे सहज हरवले. सिंधुने हा सामना ३४ मिनिटांत जिंकला. उपांत्यपूर्व फेरीत सिंधुचा सामना चीनच्या ताय झू यिंगसोहत होणार आहे.  सिंधुचा तिच्यासोबतचा विजयाचा आलेख ४-१० असा आहे.

तर दुसरीकडे, भारताच्या १६व्या मानांकित बी. साईप्रणीतने  इंडोनेशियाच्या अँथनी जिनटिंग याला २१-१९, २१-१३ असे हरवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अँथनी हा जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर आहे. उपांत्यपूर्व फेरीत साईप्रणीतचा सामना इंडोनेशियाच्या जोनाटन क्रिस्टिलीसोबत होणार आहे.

सातव्या मानांकित किदम्बी श्रीकांत याला थायलंडच्या १२व्या मानांकित कँटाफोन वँगचॅरेओन याने १४-२१, १३-२१ असे हरवले. तर, माजी ऑलिम्पिक विजेत्या लिन डॅनला दुसऱ्या फेरीत हरवणाऱ्या प्रणॉयचे आव्हान जपानच्या केंटो मोमोटा याने संपुष्टात आणले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.