नवी दिल्ली - कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढाईसाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. क्रीडाक्षेत्रही या मदतीच्या लाटेल मागे राहिलेले नाही. राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनीही या जागतिक महामारीविरूद्ध लढा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या प्राणघातक विषाणूविरूद्ध मदत करण्यासाठी गोपीचंद यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदत निधीत एकूण 26 लाख रुपयांचे योगदान दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केलेल्या 'पीएम केअर फंड'ला त्यांनी 11 लाख रुपये दिले आहेत. यासह त्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्री मदत निधीला 10 लाख रुपये आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री मदत निधीला 5 लाख रुपये दिले आहेत.
गोपीचंद यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की कोरोना विरूद्ध लढण्यासाठी मी केंद्र व राज्य सरकारला कमी पाठिंबा देत आहे.
भारताला दोन ऑलिम्पिक पदके मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे गोपीचंद म्हणाले, "आपण सर्वांनी मदत केली पाहिजे." लोकांना सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची विनंतीही त्यांनी केली. घरी राहा, सुरक्षित राहा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.