नवी दिल्ली - भारतीय बॅ़डमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी लॉक़डाऊन दरम्यान शारीरिक शिक्षणावर भर दिला आहे. गोपीचंद यांनी मार्गारेट व्हाइटहेड यांच्यासोबत शारीरिक शिक्षणाला चालना देण्यासाठी सर्वोच्च नेतृत्व आवश्यक असल्याचे सांगितले. व्हाइटहेड यांचे शारीरिक शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे नाव आहे.
ईएलएमएस स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे आयोजित वेबिनारमध्ये गोपीचंद यांनी सांगितले, की शारीरिक शिक्षण हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मला असे वाटते की या क्षेत्राला मूलभूत विचारधारेमध्ये आणले जाणे आवश्यक आहे. आरोग्य, तंदुरुस्ती आणि या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. खासकरुन कोरोनाच्या संकटात आपल्याला या गोष्टीची अधिकाधिक आवश्यक आहे. "
दुसरीकडे, ईएलएमएस स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या सह-प्रवर्तक वीता दानी म्हणाल्या, "या आव्हानात्मक काळामध्ये आम्हाला एक निरोगी आणि आनंदी देश हवा आहे. गोपीचंद यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींनी क्रीडा क्षेत्रात सुधारणा घडवून मोठी भूमिका बजावली आहे."