मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकन खेळाडू जेनिफर ब्रॅडीचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन 2021 चा किताब जिंकला. ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ओसाकाने दोन सेटमध्ये ब्रॅडीचा 6-4, 6-3 असा पराभव केला. आठव्यांदा ग्रँडस्लॅममध्ये खेळताना तिने चारवेळा विजेते पद मिळवले आहे.
-
𝒯𝒽𝒶𝓉 𝓂𝑜𝓂𝑒𝓃𝓉.
— #AusOpen (@AustralianOpen) February 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
When @naomiosaka became our 2021 Women's Singles champion 🏆#AO2021 | #AusOpen pic.twitter.com/Id3ZZhaJHh
">𝒯𝒽𝒶𝓉 𝓂𝑜𝓂𝑒𝓃𝓉.
— #AusOpen (@AustralianOpen) February 20, 2021
When @naomiosaka became our 2021 Women's Singles champion 🏆#AO2021 | #AusOpen pic.twitter.com/Id3ZZhaJHh𝒯𝒽𝒶𝓉 𝓂𝑜𝓂𝑒𝓃𝓉.
— #AusOpen (@AustralianOpen) February 20, 2021
When @naomiosaka became our 2021 Women's Singles champion 🏆#AO2021 | #AusOpen pic.twitter.com/Id3ZZhaJHh
ओसाकाने आपल्या कारकिर्दीतील चौथे ग्रँड स्लॅम जिंकले आहे. ओसाकाने गेल्या वर्षी अमेरिकन ओपनचे जेतेपद जिंकले होते. 2018 मध्ये तिने यूएस ओपन आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनची ट्रॉफी जिंकली. 23 वर्षीय ओसाकाचा जन्म जपानमध्ये झाला होता, परंतु ती तीन वर्षांची असताना कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाली.
सुमारे 7,500 प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बसण्याची परवानगी होती. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी असल्याने स्पर्धेच्या सुरुवातीला पाच दिवस प्रेक्षकांना प्रवेश थांबवण्यात आला होता.
सध्या खेळत असलेल्या महिला खेळांडूंपैकी सेरेना विल्यम्स (23) आणि व्हिनस विल्यम्स (सात) यांच्याकडे ओसाकापेक्षा जास्त ग्रँड स्लॅम जिंकले आहेत.