क्वॉलालंपूर - भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने २०२० वर्षाची सुरूवात विजयाने केली. तिने मलेशिया मास्टर्स स्पर्धेत दुसरी फेरी गाठली. सिंधूने पहिल्या फेरीत रुसच्या येवगेनिया कोसेत्सकाया हिचा पराभव केला. दुसरीकडे पुरुष गटात बी. साईप्रणीत, किदाम्बी श्रीकांत यांच्यासह पारुपल्ली कश्यपला पराभवचा धक्का बसला.
सिंधूने सहाव्या मानांकित रुसच्या येवगेनिया कोसेत्सकाया हिचा ३५ मिनिटात पराभव केला. तिने कोसेत्सकायावर २१-१५, २१-१३ अशी मात केली.
पुरूष गटात पारुपल्ली कश्यपचा जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या केंटो मोमोटाने पराभव केला. मोमोटाने सामन्यात २१-१७, २१-१६ अशी बाजी मारली.
दरम्यान, पुरुष गटात मलेशिया मास्टर्स स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत आणि बी. साईप्रणीत यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. तसेच मंगळवारी पुरुष दुहेरीत भारताची सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा पराभव झाला आहे.
एचएच प्रणॉयने जापानच्या के कांता सुनामीचा २१-९, २१-१७ ने पराभव करत उपउपांत्य फेरी गाठली. तर समीर वर्माने थायलंडच्या कांताफोन वांगचारोएनचा २१-१६, २१-१५ ने पराभव करत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
हेही वाचा - Malaysia Masters २०२० : सायना दुसऱ्या फेरीत, साईप्रणितसह श्रीकांतचे आव्हान संपूष्टात
हेही वाचा -