क्वॉलालंपूर - सायना नेहवाल पाठोपाठ पी. व्ही. सिंधूनेही मलेशिया मास्टर्स स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने दुसऱ्या फेरीत जपानच्या अया ओहारी हिचा पराभव केला. तर दुसरीकडे पुरुष गटात समीर वर्मासह एचएस प्रणॉयचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
सिंधू आणि सायना यांना मागील काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. दोघींनाही मागील काही स्पर्धेची दुसरी फेरी गाठता आली नव्हती. मात्र, २०२० वर्षाच्या सुरुवातीची मलेशिया मास्टर्स स्पर्धेत दोघींनीही चांगला खेळ करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. दुसऱ्या फेरीत सिंधूने जपानची ओहारी हिचा २१-१०, २१-१५ असा पराभव केला.
दुसरीकडे पुरुष गटात समीर वर्माला मलेशियाच्या जियाने २१-१९, २२-२० असा पराभव केला. समीरसह एचएस प्रणॉयचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. प्रणॉयला जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या केंटो मोमोटाने २१-१४, २१-१६ अशा पराभव केला. यापूर्वीच्या सामन्यात मोमोटाने भारतीय पारूपल्ली कश्यपचा २१-१७, २१-१६ ने पराभव केला आहे.
हेही वाचा - Malaysia Masters २०२० : सायनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
हेही वाचा - राजकारणातील वस्ताद शरद पवारांकडून महाराष्ट्र केसरी हर्षवर्धनला १२ लाखांचा धनादेश..