क्वॉलालंपूर - चीनची चेन यु फेई हिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ताई झू यिंगचा पराभव करत मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात चेन यु फेईने चायनीज तैपेईच्या ताई झू यिंगचा २१-१७, २१-१० ने पराभव केला. ३७ मिनिटे रंगलेल्या सामन्यात, फेईला पहिला गेम जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. तिने अखेर पहिला गेम २१-१७ ने जिंकत सामन्यात आघाडी घेतली.
दुसऱ्या गेममध्ये तिने आपली लय कायम राखली आणि यिंगला वरचढ होऊ दिले नाही. फेईने यिंगला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या गेममध्ये २१-१० अशी बाजी मारत तिने विजेतेपद पटकावले.
दरम्यान, फेई आणि यिंग या दोघी आतापर्यंत १७ वेळा समोरासमोर आल्या आहेत. त्यात फेईने तिसऱ्यादा यिंगला हरवले. तर राहिलेल्या सामन्यात यिंगने फेईचा पराभव केला होता. यामुळे अंतिम सामन्यात यिंगचे पारडे जड मानले जात होते. मात्र, फेईने यिंगला परावचा धक्का देत विजेतेपदावर नाव कोरलं.
यिंगने उपांत्यपूर्व फेरीत भारताची पी. व्ही. सिंधूला धूळ चारली होती. तर फेईने उपांत्य फेरीत ऑलिम्पिक विजेती कॅरोलिन मरिनचा पराभव केला होता.
हेही वाचा - 'तिरंग्या'ची शान वाढवणाऱ्या महिलांचा सन्मान, 'पद्म'साठी ९ महिला खेळाडूंची शिफारस
हेही वाचा - 'सुवर्ण'सिंधूचा वर्कआऊट पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, 'मी व्हिडिओ पाहूनच थकलो'