ETV Bharat / sports

कोरिया ओपन : कश्यप उपांत्य फेरीत पराभूत, भारताचे आव्हान संपुष्टात - पारुपल्ली कश्यप विषयी बातमी

उपांत्य फेरीच्या सामन्यात पारुपल्ली कश्यप विरुध्द केंटो मोमाटा अशी लढत झाली. या लढतीतल मोमाटाने कश्यपचा १३-२१, १५-२१ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत केंटो मोमोटासमोर तैवानच्या टिएन चेन चोऊ याचे आव्हान असणार आहे.

कोरिया ओपन : कश्यप उपांत्य फेरीत पराभूत, भारताचे आव्हान संपुष्टात
author img

By

Published : Sep 28, 2019, 4:49 PM IST

Updated : Sep 28, 2019, 5:20 PM IST

इन्चॉन (दक्षिण कोरिया ) - भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपचे कोरिया ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्य फेरीत जपानच्या केंटो मोमोटाने कश्यपचा पराभव केला. कश्यपच्या रुपाने कोरिया ओपन स्पर्धेत भारताचा एकमेव खेळाडू अखेरच्या टप्प्यात पोहोचला होता.

उपांत्य फेरीच्या सामन्यात पारुपल्ली कश्यप विरुध्द केंटो मोमाटा अशी लढत झाली. या लढतीतल मोमाटाने कश्यपचा १३-२१, १५-२१ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत केंटो मोमोटासमोर तैवानच्या टिएन चेन चोऊ याचे आव्हान असणार आहे.

दरम्यान, केंटो मोमाटा हा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. यामुळे त्याच्याविरुध्द स्पर्धेचा उपांत्य सामना कश्यपसाठी सोपा नसणार, याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अपेक्षेप्रमाणेच मोमाटाने सामना एकतर्फी जिंकत अंतिम फेरी गाठली.

हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी

कोरिया ओपन स्पर्धेत भारतीय पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि साईप्रणीत यांचा पराभव झाला. यामुळे कश्यपच्या रुपाने भारताचे एकमात्र आव्हान राहिले होते. मात्र, कश्यपच्या पराभवनंतर भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

हेही वाचा - 'तिरंग्या'ची शान वाढवणाऱ्या महिलांचा सन्मान, 'पद्म'साठी ९ महिला खेळाडूंची शिफारस

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
Last Updated : Sep 28, 2019, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.