इन्चॉन (दक्षिण कोरिया ) - भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपने कोरिया ओपन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. कश्यपने गुरुवारी झालेल्या सामन्यात मलेशियाचा खेळाडू डेरेन लियू याचा पराभव केला.
कोरिया ओपन सुपर ५०० स्पर्धेत ५६ मिनिटे रंगलेल्या सामन्यात कश्यपने डेरेनचा २१-१७, ११-२१, २१-१२ ने पराभव केला. डेरेनने स्पर्धेच्या पहिल्या फेरीत चीनचा दिग्गज खेळाडू लिन डॅनचा पराभव केला होता. यामुळे कश्यप विरुध्दच्या सामन्यात त्याचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कश्यपने डेरेनला धुळ चारत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
-
🇮🇳’s @parupallik sealed his place in the quarterfinals of #KoreaOpenSuper500 after getting better of 🇲🇾’s Liew Daren by 21-17,11-21,21-12.
— BAI Media (@BAI_Media) September 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Keep the momentum going champ!👏#IndiaontheRise #badminton pic.twitter.com/VvPyYSU41P
">🇮🇳’s @parupallik sealed his place in the quarterfinals of #KoreaOpenSuper500 after getting better of 🇲🇾’s Liew Daren by 21-17,11-21,21-12.
— BAI Media (@BAI_Media) September 26, 2019
Keep the momentum going champ!👏#IndiaontheRise #badminton pic.twitter.com/VvPyYSU41P🇮🇳’s @parupallik sealed his place in the quarterfinals of #KoreaOpenSuper500 after getting better of 🇲🇾’s Liew Daren by 21-17,11-21,21-12.
— BAI Media (@BAI_Media) September 26, 2019
Keep the momentum going champ!👏#IndiaontheRise #badminton pic.twitter.com/VvPyYSU41P
हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी
उपांत्यपूर्व फेरीत कश्यपचा सामना डेनमार्कचा के जॉन जॉर्गेन्सन याच्याशी होणार आहे. डेनमार्कच्या खेळाडूने इंडोनेशियाच्या के सिनिसुका याचा १७-२१, २१-१६, २१-१३ ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
दरम्यान, कोरिया ओपन स्पर्धेच्या महिला गटात भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांचा पहिल्या फेरीत पराभव झाला आहे.
हेही वाचा - कोरिया ओपन : भारताला मोठा धक्का, सिंधु पहिल्याच फेरीत गारद
हेही वाचा - कोरिया ओपन : सिंधू पाठोपाठ सायनाचेही आव्हान संपुष्टात