बासेल - भारताचा पुरूष बॅडमिंटनपटू किंदाम्बी श्रीकांतचे स्वीस ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीकांतचा डेन्मार्कच्या विक्टर अलेक्सन याने पराभव केला.
उपांत्य फेरीत श्रीकांतचा सामना डेन्मार्कच्या विक्टरशी झाला. ४१ मिनिटे रंगलेल्या सामन्यात विक्टरने श्रीकांतचा २१-१३, २१-१९ अशा फरकाने पराभव केला. दरम्यान, या दोन खेळाडूत आतापर्यंत ९ सामने झाली आहेत. यात विक्टरने ६ वेळा बाजी मारली आहे. तर श्रीकांतला ३ सामन्यात विजय नोंदवला आला आहे.
-
TOUGH LUCK! 🙇🏿♂️🙌
— BAI Media (@BAI_Media) March 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
2️⃣0️⃣2️⃣1️⃣Swiss Open Challenge comes to end for 🇮🇳 @srikidambi after he went to World No. 2️⃣ & No. 1️⃣ seeded shuttler Viktor Axelsen of 🇩🇰 in the semifinals.
Final Score: 13-21, 19-21
Comeback stronger, champ!#SwissOpen2021#SwissOpenSuper300 #HSBCbadminton pic.twitter.com/iJdkhpKgHn
">TOUGH LUCK! 🙇🏿♂️🙌
— BAI Media (@BAI_Media) March 6, 2021
2️⃣0️⃣2️⃣1️⃣Swiss Open Challenge comes to end for 🇮🇳 @srikidambi after he went to World No. 2️⃣ & No. 1️⃣ seeded shuttler Viktor Axelsen of 🇩🇰 in the semifinals.
Final Score: 13-21, 19-21
Comeback stronger, champ!#SwissOpen2021#SwissOpenSuper300 #HSBCbadminton pic.twitter.com/iJdkhpKgHnTOUGH LUCK! 🙇🏿♂️🙌
— BAI Media (@BAI_Media) March 6, 2021
2️⃣0️⃣2️⃣1️⃣Swiss Open Challenge comes to end for 🇮🇳 @srikidambi after he went to World No. 2️⃣ & No. 1️⃣ seeded shuttler Viktor Axelsen of 🇩🇰 in the semifinals.
Final Score: 13-21, 19-21
Comeback stronger, champ!#SwissOpen2021#SwissOpenSuper300 #HSBCbadminton pic.twitter.com/iJdkhpKgHn
सिंधूची अंतिम फेरीत धडक -
दुसरीकडे भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने स्वीस ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तिने उपांत्य फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डट हिचा सरळ गेममध्ये पराभव केला. विश्वविजेती आणि ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी सिंधूने डेन्मार्कच्या मियाचा २२-२०, २१-१० अशा पराभव केला. सिंधूने ४३ व्या मिनिटात मियाचा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली.
हेही वाचा - Swiss Open : सायना, कश्यपचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात
हेही वाचा - सिंधूची स्वीस ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक