बँकॉक - भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने सध्या सुरू असलेल्या थायलंड ओपनचा पहिला फेरीचा सामना जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत सध्या १४व्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतने सौरभ वर्माचा २१-१२, २१-११ असा पराभ करत दुसरी फेरी गाठली. ३१ मिनिटांत श्रीकांतने हा सामना आपल्या नावावर केला.
हेही वाचा - पांड्या-हुड्डाच्या भांडणात इरफान पठाणची उडी, म्हणाला...
या विजयासह २७ वर्षीय श्रीकांतने सौरभविरुद्ध ३-० अस रेकॉर्ड नोंदवला आहे. तत्पूर्वी, श्रीकांतने २०१९ मध्ये हाँगकाँग ओपन आणि २०१३ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये सौरभचा पराभव केला होता. तत्पूर्वी, भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप थायलंड ओपन सुपर १००० स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडला आहे. तंदुरुस्तीच्या कारणामुळे कश्यपने पहिला सामना अर्ध्यातच सोडला. कॅनडाच्या जेसन अथनीसोबत तो तिसऱ्या सेटमध्ये ८-१५ असा मागे होता.
जेसनने पहिल्या सेटमध्ये कश्यपला २१-९ असे हरवले. तर, दुसऱ्या सेटमध्ये कश्यपने २१-१३ असे पुनरागमन केले. तिसऱ्या सेटमध्ये स्नायू ताणले गेल्यामुळे कश्यपला माघार घ्यावी लागली. दुसरीकडे, पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने कोरियाच्या किम जि जुंग आणि ली योंग डाएला १९-२१, २१-१६, २१-१४ अशी मात देत दुसरी फेरी गाठली.